शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

युती केवळ मुंबई-ठाण्यापुरतीच

By admin | Updated: January 12, 2017 04:54 IST

दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी भाजपासोबत युती करण्यास शिवसेनेचे पक्षप्रमुख

यदु जोशी / मुंबईदहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी भाजपासोबत युती करण्यास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनुकूलता दर्शविली असली तरी, केवळ मुंबई आणि ठाण्यापुरतीच युती करण्याचा पवित्रा भाजपाने घेतला आहे. अन्य महापालिका व जिल्हा परिषदांच्या बाबतीत स्थानिक पदाधिकाऱ्यांना युती करण्याबाबतचे अधिकार देण्याचे भाजपाने ठरविले आहे. शिवसेनेला मात्र सर्वत्रच भाजपाशी हवी युती हवी असली तरी ठाणे व मुंबई महापालिका सेनेसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. त्यामुळे त्या जिंकण्यासाठी युती झाली तरी सेनानेते त्यास तयार होतील, असे दिसते. युतीसाठी माझ्याकडे एक फॉर्म्युला असून दोन्ही पक्षाचे निवडक तीन नेत्यांसोबत त्यावर चर्चा होऊ शकते. मात्र, अंतिम निर्णय मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. मात्र, रात्री उशीरापर्यंत भाजपाकडून चर्चेचा प्रस्ताव गेला नव्हता. उलट, स्थानिक पालकमंत्री, मंत्री, जिल्हाध्यक्ष, संघटन मंत्री वा ज्येष्ठ आमदारांचा समावेश असलेली एक समिती तयार करून स्थानिक शिवसेना पदाधिकारी, नेत्यांशी युतीबाबत चर्चा करावी, असे आदेश प्रदेश भाजपाकडून देण्यात आले आहेत. आज भाजपाची ठाण्यात बैठक भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक गुरुवारी ठाणे येथे होणार आहे. या बैठकीत फक्त पदाधिकारी बैठक वगळता अन्य तीन सत्र आणि समारोपाचे सत्रदेखील पत्रकारांसाठी खुले असेल. पत्रकारांना मज्जाव केल्यास उलटसुलट बातम्या येण्याऐवजी ‘लाईव्ह रिपोर्टिंग’ करू दिलेले चांगले असा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.