शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकार जास्त काळ टिकणार नाही : जयंत पाटील

By admin | Updated: January 13, 2015 00:07 IST

भाजप-सेनेत सत्तेसाठी मोठी धुसफूस सुरू दोन, तीन वर्षात पुन्हा बहुजनांचे सरकार येईल.

मिरज : भाजप-शिवसेनेमध्ये मोठी धुसफूस असल्याने युती सरकार जास्त काळ टिकणारे नाही. दोन-तीन वर्षात पुन्हा बहुजनांचे सरकार येईल, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी केले. मल्लेवाडी (ता. मिरज) येथे आज, सोमवारी राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माताई होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जयंत पाटील म्हणाले की, नकारात्मक मतदानामुळे राज्यात ब्राह्मण्यवाद्यांचे सरकार सत्तेवर आले. फडणवीस, जावडेकर, केळकर या मंडळींनी शेती कधीही केली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहीत नाहीत. भाजप-सेनेत सत्तेसाठी मोठी धुसफूस सुरू असल्याने युती शासन जास्त काळ टिकणारे नाही. दोन, तीन वर्षात पुन्हा बहुजनांचे सरकार येईल. मिरज तालुक्यात कुंपणावरचे नेते विधानसभा निवडणुकीवेळी पक्षातून बाहेर पडले. राहिलेले सर्व पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्ष आता संपल्याने भाजपशी मुकाबला करायचा आहे. तालुक्यातील सोसायट्या, ग्रामपंचायती यांनी निवडणुकांच्या तयारीला लागावे, दोन वर्षात येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी गाव कमिट्या, प्रभाग समित्या, युवक, महिला आाघाड्या तयार करा, शेतकरी शेतमजुरांची कामे करून त्यांचा विश्वास मिळावा. मिरज पूर्व भागातील रस्ते व पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, पंचायत समिती सदस्या सारिका खताळ, बाळासाहेब होनमोरे, अनिता कदम, गंगाधर तोडकर, परशुराम नागरगोजे, आरगचे सरपंच एस. आर. पाटील, परशुराम जाधव, बाळासाहेब माळी, अर्जुन माळी उपस्थित होते. (वार्ताहर)