शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कोणार्क, कलानींवर दबावाचा आरोप

By admin | Updated: August 22, 2016 03:47 IST

आमदार ज्योती कलानी यांनी मानसिक दबाव टाकला होता, असा खळबळजनक दावा करपे यांची कन्या दीप्ती हिने केला

सदानंद नाईक,

उल्हासनगर- शहाड येथील कोणार्क गृहनिर्माण प्रकल्पाला पूर्णत्वाचा दाखला देण्याकरिता माझे वडील व उल्हासनगर महापालिकेचे नगररचनाकार संजीव करपे यांच्यावर संबंधित बांधकाम कंपनी व आमदार ज्योती कलानी यांनी मानसिक दबाव टाकला होता, असा खळबळजनक दावा करपे यांची कन्या दीप्ती हिने केला आहे.शहर विकास आराखड्याच्या बैठकीकरिता शनिवारी पुण्याला निघालेले करपे तेथे पोहोचले नाही. त्यांचा मोबाइल लागला नाही. त्यामुळे करपे कुटुंबीयांनी खोपोली पोलीस ठाण्यात संजीव बेपत्ता असल्याची तक्रार केली. शनिवारी रात्रीपासून पोलिसांनी हा परिसर पिंजून काढला. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. दीप्ती यांच्या मते पप्पा काही दिवसांपासून प्रचंड मानसिक दबावाखाली होते. त्यामुळे त्यांनी जर जीवाचे काही बरेवाईट करून घेतले असेल, तर त्याला सर्वस्वी दबाव टाकणारी मंडळी जबाबदार असतील.कलानी यांनीच केली होती तक्रारनगररचनाकार करपे यांनी हरित क्षेत्रासह वाढीव मजल्यांच्या बांधकामाला परवानगी दिल्याचे पत्र आमदार ज्योती कलानी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. या प्रकारात कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाली असल्याने चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे करपे मानसिक दबावाखाली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. आयुक्त हिरे यांनी घेतली करपे कुटुंबाची भेटआयुक्त मनोहर हिरे यांनी करपे यांच्या अंधेरी येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. करपे यांचा कसून शोध घेतला जाईल व प्रशासन त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे हिरे यांनी आश्वस्त केले.शिबिरांत दिली बांधकाम परवानगीकरपे यांची नियुक्तीनंतर बांधकाम परवाने देताना सावध भूमिका घेत होते. आयुक्त मनोहर हिरे यांनी सहा महिन्यांत दोन विशेष शिबिरे भरवून बांधकाम परवाने देण्याचे काम केले. या शिबिरामुळे पालिकेला ७ ते ८ कोटींचे उत्पन्न मिळाले होते.>मोबाइलमधील सर्व नंबर केले डिलीट पुण्यातील बैठकीकरिता अंधेरीतून निघालेल्या करपे यांनी स्वत:ची मोटार सोडून दिली. त्यानंतर, त्यांचा ठावठिकाणा नाही. खोपोली पोलीस ठाण्यात करपे हरवल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने नोंदवल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अशोक ठाकूर यांनी बोरघाट परिसर पोलीस पथकाच्या साहाय्याने पिंजून काढला. सोमवारी करपे यांच्या एअरटेल मोबाइलचे लोकेशन तपासण्यात येणार आहेत. त्यांच्या गाडीत बॅग, ४ हजार रुपये रोख तसेच बंद अवस्थेतील मोबाइल मिळाला आहे. मोबाइलमधील सर्व नंबर डिलीट केले आहेत. कन्या दीप्ती, दूधवाला व गाडीचालक असे केवळ चारच नंबर त्यांनी डिलीट केले नाहीत, असे दीप्तीने सांगितले.