शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

खोतकरांवरील आरोपांची एसीबीकडून चौकशी

By admin | Updated: August 20, 2016 06:05 IST

आम आदमी पार्टीने पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर केलेल्या आरोपांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

- यदु जोशी, मुंबई

आम आदमी पार्टीने पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर केलेल्या आरोपांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. खोतकर यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपल्यावर झालेल्या आरोपांची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांनी तसे पत्रदेखील मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी एसीबी चौकशीचा निर्णय घेतला. एखाद्या मंत्र्यांवरील आरोपांची एसीबीमार्फत चौकशी होण्याची फडणवीस सरकारमधील ही पहिलीच वेळ आहे. स्वत: खोतकर यांनीच नि:ष्पक्ष चौकशीची मागणी केल्याने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. याआधी शिवसेनेच्या मंत्र्यांवर झालेल्या आरोपांचे जोरदार खंडन मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी केले होते. ‘आप’च्या नेत्या प्रीती मेनन यांनी १६ आॅस्गस्टला पत्र परिषद घेऊन खोतकर यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती या नात्याने ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात, ‘जालना बाजार समितीवरील आरोपांची नि:ष्पक्ष चौकशी करा आणि ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या, अशी विनंती केली. १९९० पासून सार्वजनिक जिवनात आपण प्रामाणिकपणे काम करीत आहोत. आपल्यावरील ‘आप’चे आरोप बिनबुडाचे असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. खोतकर यांनी या पत्रासोबत आरोपांबाबत काही कागदपत्रेही मुख्यमंत्र्यांच्या सुपूर्द केली.खोतकर यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यावरील आरोपांबाबत बाजू मांडली. चौकशी सुरू...एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्रिपदाच्या काळात केलेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्र्तींमार्फत केली जात आहे. पंकजा मुंडे, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर आदी मंत्र्यांवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आरोप झाले. ‘विरोधकांच्या आरोपांमध्ये दम नाही’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जोरदार बचाव केला होता.मंत्री अर्जुन खोतकर यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच शिवसेनेच्या मंत्र्यांची चौकशी होत आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यावर घोटाळ्यांचे मोठे आरोप झाले होते. मात्र त्यांच्यावरील आरोपही मुख्यमंत्र्यांनी खोडून काढले होते.