शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या सर्व प्रवाशांना आता अंथरूण-पांघरूण

By admin | Updated: August 26, 2016 06:54 IST

मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने (इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन) ‘ई-बेडरोल’ सेवा सुरू केली आहे.

मुंबई : मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने (इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन) ‘ई-बेडरोल’ सेवा सुरू केली आहे. याद्वारे प्रवाशांना ट्रेनमध्येच अंथरूण-पांघरूण (बेडरोल किट) मिळेल. प्रारंभी त्याची अंमलबजावणी मुंबई सेंट्रल आणि सीएसटी येथून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठी करण्यात येत असल्याची माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली. मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करताना रात्रीच्या वेळी आराम करण्यासाठी प्रवाशांना अंथरूण-पांघरूण उपलब्ध होत नाही. एसी डब्यांशिवाय अन्य स्लीपर किंवा जनरल डब्यांमध्ये अशी सुविधा नसल्याने, लांबच्या प्रवासात प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे या प्रवाशांना हे साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी आयआरसीटीसीने ‘ई-बेडरोल’ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंबई सेंट्रल आणि सीएसटीतून सुटणाऱ्या ट्रेनसाठी बुधवारपासून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून नवी दिल्ली, चेन्नई, त्रिवेंद्रम, हजरत निजामुद्दीनच्या मेल-एक्स्प्रेस प्रवाशांना याचा लाभ घेता येईल, अशी माहिती आयआरसीटीसीचे गट महाव्यवस्थापक (पश्चिम झोन) अरविंद मालखेडे यांनी दिली. ही सुविधा सध्या सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यावर, ती अन्य स्थानकांवर सुरू केली जाणार आहे. (प्रतिनिधी)>साहित्यासाठी किंमतदोन बेडशीट आणि उशी या संचासाठी १४0 रुपये तर लोकरी ब्लँकेटसाठी ११0 रुपये मोजावे लागतील.www.irctctourism.com  या वेबसाईटद्वारे प्रवाशांना बेडरोल बुक करता येईल आणि त्यांना ट्रेनमध्ये हे साहित्य उपलब्ध होईल.मुंबई सेंट्रल येथील फूड कोर्ट तर सीएसटी येथील फूड ट्रॅक फूड प्लाझा येथूनही प्रवासी अंथरूण-पांघरूण प्राप्त करू शकतील. त्यासाठी आॅनलाइनमधून मिळालेले किट व्हाउचर त्यांना दाखवावे लागेल.