शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’ सिटी संदर्भात सर्वपक्षीय बैठक

By admin | Updated: December 17, 2015 02:48 IST

केंद्र सरकारने देशातील १०० शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी संदर्भात लोकप्रतिनिधींनी केलेल्या वेगवेगळ्या सूचनांचा स्वीकार करण्यात येईल.

नागपूर : केंद्र सरकारने देशातील १०० शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी संदर्भात लोकप्रतिनिधींनी केलेल्या वेगवेगळ्या सूचनांचा स्वीकार करण्यात येईल. तसेच या संदर्भात सर्वपक्षीय गटनेत्यांची लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. स्मार्ट सिटी संदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. महापालिकेबाहेरील लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घ्यायला हवे. स्पेशल परपज व्हेईकल (एसपीव्ही) ची स्थापना केली जाणार आहे. एसपीव्हीला कर्ज उभारावयाचे झाल्यास यासाठी महापालिकेची मान्यता घ्यावी लागेल. पुणे महापालिकेचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या राज्यातील दहा शहरात पुणे शहराचा समावेश राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. स्मार्ट सिटी योजना ही वरच्या वर्गाला लाभ मिळण्यासाठी नसून शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा पुरविण्याचा या योजनेचा हेतू आहे. कचऱ्याची विल्हेवाट, सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर, सुरक्षित सिटी, झोपडपट्टीधारकांना चांगल्या सोयी उपलब्ध करणे. गुंतवणुकीत वाढ, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे स्मार्ट सिटी प्रस्तावाला मंजुरी देताना महापालिकेने काही अटी घालून दिल्याबाबतचा प्रश्न अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्र्यांनी महापालिकेलाच धोरण निश्चित करावयाचे असल्याचे स्पष्ट केले. शरद रणपिसे व अनिल सोले यांनी एसपीव्हीच्या अध्यक्षपदी महापौर असावा अशी सूचना केली. एसपीव्ही जेएनएनयूआरएम योजनेतही होते. यातूनच २४ बाय ७ योजना राबविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रश्नावरील चर्चेदरम्यान संजय दत्त, नीलम गोऱ्हे आदींची प्रश्न उपस्थित केले. (प्रतिनिधी)