शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पक्षांतील आयाराम रिंगणात

By admin | Updated: February 5, 2017 23:51 IST

महापालिका निवडणुकीत सेना-भाजपाकडून तब्बल ५१ विद्यमान नगरसेवक पुन्हा आपले नशीब आजमावणार आहेत. शिवसेनेने आपल्या १६, तर भाजपाने ६ नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे

नाशिक : महापालिका निवडणुकीत सेना-भाजपाकडून तब्बल ५१ विद्यमान नगरसेवक पुन्हा आपले नशीब आजमावणार आहेत. शिवसेनेने आपल्या १६, तर भाजपाने ६ नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे, तर अन्य पक्षांतून सेनेत दाखल झालेल्या १५, तर भाजपात दाखल झालेल्या १४ आयाराम नगरसेवकांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. सेना-भाजपाकडून प्रत्यक्ष किती नगरसेवकांच्या गळ्यात पुन्हा विजयमाला पडेल, याबाबत आता उत्सुकता ताणून राहील.महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. त्यानुसार दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. त्यात शिवसेना वा भाजपाने बव्हंशी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी बहाल केलेली आहे. त्यात भाजपाने विद्यमान नगरसेवक रंजना भानसी, दिनकर पाटील, प्रा. कुणाल वाघ, सुनंदा मोरे, संभाजी मोरुस्कर, सतीश कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे, तर फुलाबाई बोडके यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र कमलेश बोडके यांना, तर शालिनी पवार यांच्याऐवजी त्यांचे पती अरुण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सविता दलवाणी, सिंधू खोडे, परशराम वाघेरे व ज्योती गांगुर्डे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे खोडे वगळता अन्य तिघांनी अन्य पक्षांची उमेदवारी मिळविली आहे. भाजपाने मात्र अन्य पक्षातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करणाऱ्या उद्धव निमसे, रुची कुंभारकर, दामोदर मानकर, रेखा बेंडकुळे, शशिकांत जाधव, शिवाजी गांगुर्डे, माधुरी जाधव, अर्चना थोरात, कन्हैया साळवे, संगीता गायकवाड, कोमल मेहरोलिया, दीपाली कुलकर्णी, सतीश सोनवणे व सुदाम कोंबडे या आयारामांना उमेदवारी बहाल केली आहे. शिवसेनेने मनीषा हेकरे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, सचिन मराठे, शैलेश ढगे, सूर्यकांत लवटे, नयना घोलप, केशव पोरजे, सुनीता कोठुळे, कल्पना पांडे, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, उत्तम दोंदे, शोभा फडोळ, डी. जी. सूर्यवंशी आणि वंदना बिरारी यांना पुन्हा संधी दिली आहे. विनायक पांडे यांनी घरातच चार तिकिटे मागितल्याने राडेबाजी होऊन त्याची दखल पक्षाने घेतली. त्यामुळे विनायक पांडे लढतीत नसतील. कोमल मेहरोलिया यांनी भाजपात प्रवेश केला आहे, तर शिवाजी सहाणे यांनी पुन्हा निवडणूक न लढविण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. ४१ टक्के नगरसेवक पुन्हा नशीब आजमावत आहे. (प्रतिनिधी)