शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत डेंगीने अभियंत्याचा मृत्यू

By admin | Updated: September 18, 2016 00:44 IST

सुरेंद्र सुभाष नाईकरे (वय ४० वर्षे, रा. वृंदावन कॉलनी, आळंदी) या खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या अभियंत्याचा पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू

आळंदी : डेंगीची लागण होऊन येथील अभियंते सुरेंद्र सुभाष नाईकरे (वय ४० वर्षे, रा. वृंदावन कॉलनी, आळंदी) या खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या अभियंत्याचा पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. १५) घडली. सुरेंद्र हे पुणे जिल्हा काँग्रसेचे सरचिटणीस संदीप नाईकरे यांचे मोठे बंधू आहेत. त्यांच्या मागे आईवडील, भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. नाईकरे यांना पाच-सहा दिवस ताप होता. येथील स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर, त्यांना मंगळवारी पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले होते. प्रकृती अधिक खालवल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. परंतु, गुरुवारी दुपारी ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांना रुग्णालयाच्या वतीने मृत घोषित करण्यात आले. आळंदी शहरात डेंगीच्या तापाची साथ पसरली असून, सुमारे चाळीस ते पन्नास रुग्ण खासगी व सरकारी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समोर येत आहे. पालिकेकडून शहर स्वच्छतेसाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च होत असतानाही डेंगीसारख्या साथीवर प्रतिबंध आणण्यात त्यांना अपयश येत आहे. त्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने े ताप पसरण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे . (वार्ताहर)