शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीमध्ये भरदिवसा घरफोडी; दागिने लंपास

By admin | Updated: September 18, 2016 00:56 IST

मुलाला शाळेत सोडविण्यासाठी गेलेल्या कुटुंबाची घरफोडी करून सुमारे २० तोळे सोने आणि ३० हजारांची रोकड अज्ञात दरोडेखोरांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी घडली़

पिंपरी : घर बंद करून, लॉक लावून मुलाला शाळेत सोडविण्यासाठी गेलेल्या कुटुंबाची घरफोडी करून सुमारे २० तोळे सोने आणि ३० हजारांची रोकड अज्ञात दरोडेखोरांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी घडली़ आळंदी देवाची येथील पसायदान सोसायटीत सकाळी अकरा वाजता ही घटना घडली़ याबाबत श्रीकांत भानुदास तापकीर (वय ३६, रा़ पसायदान सोसायटी, आळंदी देवाची, ता़ खेड) यांनी आळंदी देवाची पोलीस ठाण्यात फि र्याद दिली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत यांच्या पत्नी जयमाला सकाळी लवकर कामाला गेल्या होत्या़ त्यामुळे मुलाला शाळेत सोडविण्यासाठी श्रीकांत यांनी सकाळी अकराच्या दरम्यान घर बंद करून लॉक लावले़ त्यांनी मुलाला सोसायटीजवळच असलेल्या शाळेत सोडले़ दुपारी बाराच्या सुमारास काम उरकल्यानंतर ते घरी परतले़ तेव्हा घराचा दरवाजा उघडलेल्या अवस्थेत आढळून आला़ त्यांनी घरात प्रवेश करून पाहिले असता, घरातील बंद कपाटे उचकटून कोणी तरी अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले सुमारे २० तोळे दागिने आणि ३० हजारांची रोकड चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले़ दोनच दिवसांपूर्वी श्रीकांत यांच्या पत्नी जयमाला तापकीर यांनी आपल्या वडिलांकडून इमारतीच्या बांधकामासाठी २० तोळे दागिने आणले होते़ त्याची चोरी झाल्याचे लक्षात येताच श्रीकांत यांनी आळंदी देवाची पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली़ पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली़ या वेळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते़ या वेळी शेजाऱ्यांनी पोलिसांना तीन लोक सोयायटीच्या आवारात संशयास्पद फिरत असल्याची माहिती दिली़ त्यानुसार पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यास सुरुवात केली़ (प्रतिनिधी)>वाढत्या दरोड्यांमुळे नागरिकांत भीतीभरदिवसा हाकेच्या अंतरावर असलेले पोलीस ठाणे आणि गजबजलेला परिसर असलेल्या सोसायटीमध्ये घरफ ोडी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे़ आळंदी पोलिसांनी चोरट्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.