शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत शनिवारी

By admin | Updated: August 13, 2014 20:54 IST

अकोला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या १६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

अकोला : महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या १६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या सोडतीला मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी हजर राहण्याचे पत्रवजा निर्देश बुधवारी प्रशासनाला प्राप्त झाले. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी असलेल्या महापौरपदाचे आरक्षण नेमके काय निघते, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१२ मध्ये पार पडली होती. तत्पूर्वी आरक्षणाच्या सोडतीदरम्यान महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव निघाल्याने काँग्रेसप्रणीत महाआघाडीच्यावतीने महापौरपदी ज्योत्स्ना गवई यांना विराजमान करण्यात आले. महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांसाठी असून, येत्या सप्टेंबर महिन्यात हा कालावधी संपुष्टात येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने त्यापूर्वी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत निघण्याचे संकेत होते. त्यापृष्ठभूमिवर १३ ऑगस्ट रोजी मनपाला शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार येत्या १६ ऑगस्ट रोजी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे. नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृहात आरक्षण सोडत काढल्या जाईल. याकरिता मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.*आरक्षणावरील संभ्रम कायममहापौरपदाच्या आरक्षणासाठी शासनाने २०११ मधील जनगणनेची आकडेवारी गृहीत धरल्यास आरक्षण सोडतीला नव्याने प्रारंभ केल्या जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आरक्षणाला खुल्या प्रवर्गापासून सुरुवात होईल. यापूर्वी महापौरपदासाठी साखळी पद्धतीने (रोटेशन) सर्वप्रथम ओबीसी प्रवर्गातील महिला, त्यानंतर खुल्या प्रवर्गातील महिला, ओबीसी प्रवर्गातील पुरुष व २०१२ मध्येअनुसूचीत जाती (एससी प्रवर्ग) प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी सोडत निघाली. यापुढील अडीच वर्षांसाठी अनुसूचित जाती पुरुष किंवा अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्ग) महिला उमेदवाराचे आरक्षण निघण्याची शक्यता आहे. एकूणच, आरक्षणाची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येईल.