शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

अजोय मेहतांना दिल्लीत बढती?

By admin | Updated: May 7, 2017 04:56 IST

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांचे केंद्रात सचिव म्हणून बढतीसाठी एम्पॅनलमेंट झाले आहे. मात्र ते दिल्लीला

विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांचे केंद्रात सचिव म्हणून बढतीसाठी एम्पॅनलमेंट झाले आहे. मात्र ते दिल्लीला जाणार की मुंबईतच राहणार याचा निर्णय केंद्र सरकारवर अवलंबून आहे. मेहता यांच्या सोबत त्यांच्याच बॅचचे अजयभूषण पांडेय आणि मालिनी शंकर यांचेही एम्पॅनलमेंट झाले, मात्र ते दोघे आधीच केंद्र सरकारच्या सेवेत आहेत. त्यांच्यानंतरच्या बॅचचे संजय भाटिया आणि भगवान सहाय यांचेही एम्पॅनलमेंट झाले आहे. त्यापैकी भाटिया मुंबई पोर्ट ट्रस्टला केंद्राच्याच नियुक्तीवर कार्यरत आहेत. देशभरातून एम्पॅनलमेंट होणाऱ्या सचिवांमधून काही सचिवांना केंद्र सरकार त्यांच्या सेवेत घेत असते. महाराष्ट्रातून एम्पॅनलमेंट झालेले पाचपैकी तीन अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. मेहता यांची नियुक्ती केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या मंत्रालयात होणार असल्याची चर्चा असताना ते लोकमतशी बोलताना म्हणाले दिल्लीत जायचे की नाही याचा निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. आणि निवडीचे अधिकार केंद्र शासनाचे आहेत. दिल्ली हे माझे होमटाऊन आहे आणि महाराष्ट्रात माझी कारकीर्द गेली आहे, त्यामुळे कुठेही काम करायला मिळाले तरी मला सारखाच आनंद आहे. मुंबईचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांचीसुद्धा मुंबई बाहेर नागरी हक्क संरक्षण, नांदेड येथे अधीक्षक पदी झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा मुंबईमध्ये फोर्स वन येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. हे नियुक्ती आदेश रद्द करत त्यांना फोर्सवनमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक पद देण्यात आले. राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त संतोष रस्तोगी यांची नवी मुंबईच्या सह आयुक्तपदी नेमणूक बदली रद्द करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव यांची पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये सहायक पोलीस महानिरीक्षक पदावर केलेली बदली रद्द करत अमरावती शहरचे पोलीस उपायुक्त म्हणून नवनियुक्ती देण्यात आली आहे.पुणे शहरचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांना मुंबईमध्ये उपायुक्तपदी देण्यात आलेली नियुक्तीसुद्धा रद्द करत राज्य राखीव पोलीस बल गट दौड येथे समादेशक म्हणून पाठविण्यात आले आहे.नाशिक शहराचे पोलीस उपायुक्त व्ही. जी. पाटील यांची गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर येथे करण्यात आलेली बदली थांबवून त्यांना महामार्ग सुरक्षा पथक मुख्यालय मुंबई येथे पोलीस अधीक्षकपदी नेमणूक देण्यात आली आहे.