शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

अजित पवारांकडे टोल मागितला?

By admin | Updated: November 24, 2014 02:53 IST

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी रविवारी रात्री टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अडवून त्यांच्याकडे टोल मागितल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली होती.

कोल्हापूर : नातेवाइकांकडील एका कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी रविवारी रात्री टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अडवून त्यांच्याकडे टोल मागितल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली होती. शिरोली टोलनाक्यावर हा प्रकार झाल्याचे बोलले जाते.अजित पवार रात्री आठच्या सुमारास नातेवाईकांकडील घरगुती कार्यक्रम आटोपून परतत असताना शिरोली टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडविली. कर्मचाऱ्यांनी चालकाकडून टोलची मागणी केली असता, चालकाने टोल देण्यास नकार दिला. त्यानंतर चालक व टोलवरील कर्मचाऱ्यांत किरकोळ शाब्दिक चकमक झाली. हा प्रकार पाहून गाडीत बसलेले अजित पवार खाली उतरले आणि कर्मचाऱ्यांची बोलती बंद झाली. नाक्यावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारीही तातडीने त्यांच्याकडे धावत आले. पवार यांना पाहून पोलिसांनाही काही वेळ सुचेनासे झाले. अजित पवारांकडे टोल मागितल्याची चूक लक्षात येताच कर्मचाऱ्यांसह सुपरवायझरची भंबेरी उडाली. अखेर कर्मचाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. हे वृत्त वाहनधारकांकडून शहरात वाऱ्यासारखे पसरले. पोलिसांसह टोलनाक्यावर चौकशी केली असता या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही.