शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाजवळ पॅराशूट नव्हे तर एअर बलून होते, दोघांना अटक

By admin | Updated: May 26, 2015 11:18 IST

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीजवळ आढळलेल्या पाच संशयास्पद वस्तू नेमक्या काय होत्या याचा उलगडा अखेर झाला असून ते पॅराशूट नसून मोठे एअर बलून होते अशी माहिती पोलिस चौकशीतून समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २५ - मुंबई विमानतळाच्या धावपट्टीजवळ आढळलेल्या पाच संशयास्पद वस्तू नेमक्या काय होत्या याचा उलगडा अखेर झाला असून ते पॅराशूट नसून मोठे एअर बलून होते अशी माहिती पोलिस चौकशीतून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान हे एअर बलून सोडण्यात आले होते. 

शनिवारी संध्याकाळी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीजवळ पॅराशूटसारख्या पाच वस्तू हवेत उडताना आढळल्या होत्या. एका वैमानिकाने याची माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिल्यावर काही वेळेपुरता विमानतळावरील विमानांचे टेक ऑफ व लँडिंग थांबवण्यात आले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली होती व थेट पंतप्रधान कार्यालयानेच या संदर्भात अहवाल मागवला होता. नागरी हवाई उड्डाण महासंचालनालयाचे पथकही चौकशीसाठी आज मुंबईत येणार होते. तर मुंबई पोलिसही या घटनेचा तपास करत होते. 

पोलिस चौकशीत हे पॅराशूट नसून एअर बलून असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी एअर इंडिया मैदानावर एका डायमंड कंपनीतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान आयोजकांनी हवेत एअर बलून सोडले होते. विना परवानगी एअर बलून सोडल्याप्रकरणी पोलिसांनी दोघा आयोजकांना अटक केली. या दोघांना आज कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.