शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वायुदलाच्या जवानाने केला बेछूट गोळीबार

By admin | Updated: May 27, 2014 22:56 IST

वायुदलाच्या जवानाने केला बेछूट गोळीबार,दोन जवान ठार, दोघे जखमी,सांताक्रुजच्या वायुदल तळावरील मध्यरात्रीचा थरार

मुंबई : वायुदलाच्या डिफेन्स सिक्युरीटी कॉप (डीएससी) विभागात सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍या माजी लष्करी जवानाने मध्यरात्री दीडच्या सुमारास आपल्या चार सहकार्‍यांवर बेछूट गोळीबार केला. त्यात दोन जवान ठार तर दोघे जखमी झाले. हा थरार सांताक्रुज, पटेलनगर येथील वायुदलाच्या सिग्नल युनिटमध्ये घडला. यादवच्या हल्ल्यात डीएससीचे गार्ड कमांडर एच.आर. सिंग आणि सोमनाथ हे दोन जवान ठार झाले; तर भीमसिंग आणि थापा हे जखमी झाले. जखमींपैकी एकाच्या पायात गोळी घुसली तर दुसर्‍याच्या शरीराला चाटून गेली. या हल्ल्यात यादवने वायुदलाने दिलेल्या एसएलआर रायफलमधून एकूण सात गोळ्या झाडल्या. लष्करातून निवृत्त झालेल्या जवानांना पुढे काम करण्याची इच्छा असल्यास डीएससी विभागात सामावून घेतले जाते. येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा आर. एच. यादव (५५) या जवानाने हा गोळीबार केला. त्यानंतर तो पसार झाला. मात्र त्याला वनराई पोलीस ठाण्याचे बीटमार्शल सचिन बाळकृष्ण वरटे आणि पथकाने ताब्यात घेतले. पुढे त्याला निर्मलनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. निर्मलनगर पोलिसांनी आरोपी यादवविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, अग्निशस्त्राचा गैरवापर असे गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. त्याचा तपशीलवार जबाब नोंदविण्याचे काम पोलीस करीत होते. सोबत यादवच्या गोळीबारात जखमी झालेल्या दोन जवानांचेही जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू होते. जखमींवर मध्यरात्रीपासूनच नौदलाच्या आयएनएस अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.निर्मलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर जांबवडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यादवने हल्ल्यात वापरलेली एसएलआर रायफल हस्तगत केली आहे. ही घटना नेमकी कशी घडली, यामागील हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तूर्तास यादव आमच्या ताब्यात आहे, असे जांबवडेकर यांनी सांगितले. यादव मूळचा राजस्थानचा असून, गेल्या दहा ते बारा वर्षांपासून डीएससी विभागात कार्यरत आहे. (प्रतिनिधी) असा घडला गोळीबारसांताक्रुज येथील वायुदलाच्या तळाला दोन प्रवेशद्वार आहेत. तेथे डीएससी विभागातील जवान सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्य बजावतात. दोन ते तीन तासांची ड्युटी प्रत्येकाच्या वाट्याला येते. ड्युटी संपवून ते पुन्हा या बराकीत आरामासाठी जातात. याच तळावर जवानांच्या वास्तव्यासाठी, आरामासाठी बराकी आहेत. तेथेच हा गोळीबार घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, यापैकी एच.आर. सिंग आणि सोमनाथ हे पहिल्या बराकीत झोपलेले होते. आरोपी यादवने बराकीचे दार उघडून ते झोपेत असतानाच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सिंग, सोमनाथ ठार झाले. त्यानंतर यादवने आपला मोर्चा दुसर्‍या बराकीकडे वळला. तेथे भीमसिंग आणि थापा झोपलेले होते. मात्र गोळीबाराच्या आवाजाने ते उठून सावध झाले होते. त्यांनी बचावासाठी धडपड केल्याने ते थेट यादवच्या प˜्यात आले नाहीत. नेम चुकल्याने दोघे जखमी झाले. गोळीबार थंडावल्यानंतर या दोघांपैकी एकाने यादववर झडप घातली. बाचाबाचीत तो यादवकडील रायफल हिसकावण्यात यशस्वी ठरला. रायफल निसटल्याने यादव तेथून पळत सुटला. सतर्क बीट मार्शलमुळे यादव ताब्यातपळत पळत यादवने वायुदलाच्या तळाबाहेरून रिक्षा पकडली. त्याच्या खिशात जेमतेम पैसे होते. त्या पैशांवर तो गोरेगाव रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचला. कर्तव्यावर असल्याने तो लष्करी गणवेशात होता. तोवर या गोळीबाराची, पसार झालेल्या यादवची माहिती निर्मलनगर पोलिसांना मिळाली. त्यांनी वायरलेसवरून यादवचा तपशील आणि घटना जाहीर करून शहरातील तमाम पोलीस ठाण्यांना सतर्क केले. सव्वा दोनच्या सुमारास यादव गोरेगाव स्थानकाच्या दिशेने वेगाने चालत होता. त्याला वनराई पोलीस ठाण्याचे बीट मार्शल सचिन वरटे यांनी पाहिले. त्यांनी लागलीच रात्रपाळीवरील अन्य अधिकार्‍यांना रेल्वे स्थानकाजवळ बोलावून घेतले. ही कुमक येण्याआधी वरटे यांनी यादवला अडवले. चौकशी सुरू केली तेव्हा मी एअरफोर्सचा जवान आहे, मला पनवेलला ड्युटीवर जायचे आहे, मला उशीर झाला आहे, मला जाऊ द्या, असे सांगितले. चौकशीदरम्यान यादवच्या छातीवरील त्याच्या नावाचा बॅच वरटे यांनी पाहिला. त्यावरून निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून पसार झालेला जवान हाच हे स्पष्ट झाले. वरटे यांनी यादवला बोलण्यात गुंतवून ठेवले तोवर वनराई पोलीस ठाण्याची वाढीव कुमक आली आणि यादवची गचांडी आवळली गेली.