शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरची नीता बनली मंगळयान मोहिमेची घटक

By admin | Updated: September 23, 2016 09:34 IST

अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रूक गावची कन्या नीता अशोक भालके हिने मंगळयान मोहिमेत योगदान दिले आहे.

विलास गुंजाळ, ऑनलाइन लोकमत

संगमनेर, दि. २३ -  कोठे बुद्रूक हे संगमनेर तालुक्यातील डोंगरदऱ्यातील छोटसं गाव. जगाच्या नकाशावर हे खेडेगाव कदाचित सापडणारही नाही. परंतु या गावची शेतकरी कन्या नीता अशोक भालके हिने मात्र आपल्या कार्यकर्तृत्वाने या गावाचे नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले आहे. संशोधन क्षेत्रात आपले जीवन वाहिलेल्या एरोस्पेस इंजिनिअर असलेल्या नीता हिने आपल्या कल्पकतेने व नवनिर्मितीने नासाच्या शास्त्रज्ञांनाही भुरळ पाडली आहे.मंगळयान या भारताच्या यशस्वी अंतराळ मोहिमेत नासाच्या टीमबरोबर योगदान देणारी नीता आता पुढील शि़क्षणासाठी थेट मँचेस्टरला रवाना झाली आहे.संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रूक या छोट्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नीता हिचे बारावीपर्यंतचे शिक्षण संगमनेरच्या बाल शिक्षण मंडळाच्या शाळेत झाले. बारावीनंतर तिने गेट परीक्षा दिली. या परीक्षेत यश मिळवल्याने तिची पवई येथे आय.आय.टी.साठी निवड झाली. या ठिकाणी तिने सादर केलेल्या फ्लार्इंग आॅब्जेक्टमुळे संबंधित संस्थेचा मोठा गौरव झाला. तिच्या बुद्धिमत्तेमुळे तिला मंगळयानाच्या मोहिमेत काम करण्याची संधी मिळाली होती. या टीममध्ये २७८ शास्त्रज्ञांचा समावेश होता. यामध्ये नीताने आपल्या बुद्धीची चमक दाखवून दिली.संशोधनाची आवड असल्याने तिने याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर पवईमार्गे तिने थेट मँचेस्टर गाठले. तिच्या निवडीमुळे कोठे बुद्रूक गावाचा गौरव झाला असून हे गाव आता तिच्या रुपाने जगाच्या नकाशावर पोहोचले आहे.नीता हिने मंगळयान या भारताच्या यशस्वी अंतराळ मोहिमेत नासाच्या टीमबरोबर योगदान दिले. आपल्या कल्पक बुद्धिमत्तेने व नवनिर्मितीने तिने नासाच्या शास्त्रज्ञांचेही आपल्याकडे लक्ष वेधले होते. या यशानंतर तिची पुढील शिक्षणासाढी मँचेस्टर येथे निवड झाली आहे. ती नुकतीच संशोधन वारीसाठी मँचेस्टरकडे रवानाही झाली. जगातील १० प्रमुख विद्यापीठांपैकी मँचेस्टर हे अग्रस्थानावरील विद्यापीठ आहे.

सुनीता, कल्पना आपल्या आयडॉलविविध अंतराळ मोहिमेत भारताकडून ठसा उमटवणाऱ्या सुनीता विल्यम्स व कल्पना चावला यांना आपण गुरुस्थानी मानतो, असे ती सांगते. खेळ आणि वाचनाचीही आपल्याला आवड असल्याचेही ती आवर्जून सांगते.