शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर दारूबळीची सीआयडी चौकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2017 02:38 IST

१५ जणांचा बळी घेणाऱ्या पांगरमल जि.अहमदनगर येथील दुर्घटनेची आयडी मार्फत चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल

मुंबई : १५ जणांचा बळी घेणाऱ्या पांगरमल जि.अहमदनगर येथील दुर्घटनेची आयडी मार्फत चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत स्पष्ट केले.भाजपाचे शिवाजीराव कर्डिले, किसन कथोरे आदी आमदारांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमांतून हा विषय उपस्थित केला होता. कर्डिले म्हणाले की, दुर्घटनेच्या एवढ्या दिवसांनंतरही पोलिसांना तीन आरोपी सापडू शकलेले नाहीत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील पार्टीमध्ये दारू पाजण्यात आली होती आणि त्यात हे बळी गेले. एवढ्या लोकांचा बळी घेणाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. २००४ मध्ये याच भागात बनावट दारुचा कारखाना पकडण्यात आला होता. त्यावेळी कारखाना मालकाऐवजी कामगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या कारखान्याचे धागेदोरे परवाच्या घटनेपर्यंत आहेत. तेव्हाच पालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असते तर अलिकडची दुर्घटना टळली असती. बावनकुळे यांनी सांगितले की, बनावट दारु प्रकरणी मुख्य आरोपी दादा वाणी याला अटक करण्यात आली. एकूण १९ आरोपींपैकी १६ आरोपिंना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागातील सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यात एक उपअधिक्षक, दोन दुय्यम निरीक्षक आणि तीन जवानांचा समावेश आहे. या बनावट दारु प्रकरणात जे मृत्यृमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रु पये शासनातर्फे देण्यात आले आहेत. राज्यातील शासकीय रुग्णालयातील उपहारगृहांची तपासणी करण्यात येणार असून नियमबाहय बाबी आढळल्या तर कारवाईची शिफारस करण्यात येणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दादा वाणी याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे ही उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)