शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

अँग्रो इको-टुरिझम हालचालींना वेग !

By admin | Updated: July 21, 2016 23:31 IST

निधी मिळण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रस्ताव करणार सादर करणार.

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अँग्रो-इको-टुरिझमची संकल्पना मांडली असून, लवकरच एका निसर्गरम्य ठिकाणी पर्यावरणपूरक पार्क साकारला जाणार आहे. याकरिता चार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने कृषी विद्यापीठातर्फे एक प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार आहे. या कामाला वेग आला आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात आले होते. तथापि, ही जागा अकोला विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारात गेल्याने कृषी विद्यापीठाने नव्याने पर्याय शोधला असून, मत्स्य विभागाच्या १९ हेक्टर जागेवर अँग्रो टुरिझम सेंटर उभारण्यासंबंधी प्रस्ताव तयार केला आहे. अगोदरच्या पर्यटनस्थळाचे साहित्य तेथे नेण्यात आले आहे. लवकरच प्राथमिक स्वरू पाच्या कामाला सुरुवात केला जणार आहे. मत्स्य प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर घनदाट वृक्षवल्ली असून, या ठिकाणी तळ्य़ांचे साम्राज्य आहे. या ठिकाणाहून नदीवजा नाला आहे. येथे घनदाट वृक्षवल्ली असल्याने या भागात हरीण व इतर तत्सम प्राण्यांचादेखील वावर आहे. त्यामुळे जंगल सफारीचा आनंद पर्यटकांना लुटता येईल. या ठिकाणी मत्स्य तलाव व इतर मोठे तळे, नाला असल्याने बोटिंगची व्यवस्था निर्माण करण्यात येईल. या सर्व दृष्टीने कृषी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत.अकोला व नजीकच्या पर्यटक-चाकरमान्यांना सुटीच्या दिवशी आनंद लुटण्यासाठी एकही स्थळ नसल्याने, हाच विचार करू न कृषी विद्यापीठाने अँग्रो इको-टुरिझम सेंटरची कल्पना मांडून हा प्रकल्प प्रत्यक्ष साकारण्याबाबत मागेच प्रस्ताव तयार केला असून, या ठिकाणी प्राथमिक स्वरू पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. विदर्भातील हे सुंदर अँग्रो टुरिझम व्हावे, याकरिता निधी उपलब्ध व्हावा, यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले असून, यासाठीचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येत आहे. याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत अकोलेकरांचे आहे.- कृषी विद्यापीठाच्या मत्स्य संशोधन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर अँग्रो-इको-टुरिझमह्ण साकरले जात आहे. पर्यावरणपूरक पर्यटनस्थळाला व्यापक व सुंदर करण्यासाठी निधीची गरज असल्याने कुलगुरू डॉ. आर.जी. दाणी यांच्या माध्यमातून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येत आहे.- डॉ. किशोर बिडवे,कुलगुरूंचे तांत्रिक सचिव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.