शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणप्रणालीत दिसणार संघाचा ‘अजेंडा’

By admin | Updated: January 16, 2015 01:04 IST

देशातील शिक्षणप्रणालीत भारतीय पारंपरिक मूल्यांना समाविष्ट करण्याच्या संघ परिवाराच्या भूमिकेबाबत केंद्र सरकारकडून विचार सुरू आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ.रामशंकर कठेरिया

मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्यांचे संकेत : पारंपरिक मूल्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा विचारनागपूर : देशातील शिक्षणप्रणालीत भारतीय पारंपरिक मूल्यांना समाविष्ट करण्याच्या संघ परिवाराच्या भूमिकेबाबत केंद्र सरकारकडून विचार सुरू आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ.रामशंकर कठेरिया यांनी गुरुवारी उपराजधानीत यासंदर्भात सूतोवाच केले. ही मूल्ये निरनिराळ्या शिक्षणशाखांच्या अभ्यासक्रमात आणण्यात काहीच गैर नाही. यासाठी आम्ही प्रयत्न करू असे वक्तव्य त्यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अत्याधुनिक व्यायामशाळेचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पुनरुत्थान विद्यापीठाच्या वतीने नागपुरात अखिल भारतीय विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. देशातील शिक्षणक्षेत्रात बदलांची आवश्यकता असून भारतीय पारंपरिक मूल्यांचा त्यात जास्तीत जास्त प्रमाणात अंतर्भाव करण्यात यावा असा सूर यात उमटला होता. यावेळी संघ परिवारातील निरनिराळ््या संघटनांसह सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीदेखील या मुद्याच्या समर्थनार्थ भाष्य केले होते.यासंदर्भात डॉ.कठेरिया यांना विचारणा करण्यात आली असता या विचारांमध्ये काहीच गैर नसल्याचे ते म्हणाले. भारतीय परंपरा आणि विचारपद्धती टिकविणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. संघाने मांडलेली भूमिका अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.धर्मरक्षेसाठी करावा शक्तीचा संचयविद्यापीठाच्या कार्यक्रमप्रसंगी डॉ.कठेरिया यांनी उपस्थितांना व्यायामाचे महत्त्व समजावून सांगितले. परंतु यावेळीदेखील त्यांचा रोख धर्मावरच होता. धकाधकीच्या जीवनात आरोग्य अन् शक्ती मिळविण्यासाठी व्यायाम आवश्यकच आहे. या शक्तीचा संचय धर्मरक्षेसाठी तसेच समाजाच्या विकासासाठी करावा असे ते म्हणाले.‘बेसिक’ सुधारायला हवेदेशातील बहुतांश राज्यांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये गणित तसेच इतर विषयांचे ‘बेसिक’ कच्चे असल्याची बाब निरनिराळ््या सर्वेक्षणातून समोर येत आहे. ही नक्कीच चिंतेची बाब असून यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.