शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

शनीशिंगणापूरात महिलेच्या बंडानंतर ग्रामस्थाचा देवाला दग्धाभिषेक

By admin | Updated: November 29, 2015 18:52 IST

शनी शिंगणापूर एका महिलेने चौथऱ्यावर जाऊन शनी देवाला तेलाचा अभिषेक केल्यानंतर शुद्धीकरणासाठी गावक-यांनी देवाला दुग्धाभिषेक घातला

 ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि.२९ - शनी शिंगणापूर एका महिलेने चौथऱ्यावर जाऊन शनी देवाला तेलाचा अभिषेक केल्यानंतर शुद्धीकरणासाठी गावक-यांनी देवाला दुग्धाभिषेक घातला. तसेच याप्रकरणी सात सुरक्षा रक्षकांना जबाबदार ठरवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

शनी शिंगणापूर येथे शनी चौथऱ्यावर महिलांना जाण्यास बंदी असतानाही शनिवारी पुण्यातील एका महिलेने चौथ-यावर जाऊन शनीे दर्शन घेतले तसेच देवाला तेलही वाहिले. यामुळे गावकरी संतप्त झाले व त्या निषेधार्थ आज शनी शिंगणापूर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून बंद मागे घेतल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.

पण या घटनेनंतर देवाच्या शुद्धीकरणासाठी ग्रामस्थांनी शनी देवाला दुग्धाभिषेक घातला. तसेच ग्रामसभा घेऊन सुरक्षा यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप ठेवत सात सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले. मात्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीने त्या महिलेच्या धाडसाचे स्वागत केले आहे.

शनीशिंगणापूरात शनिवारी भाविकांची संख्या नेहमीपेक्षा जास्त असते. त्यामुळे अनेकदा सुरक्षाव्यवस्थेचा बोजवारा उडतो. शनिवारी ही महिला चौथऱ्यावर गेली आणि तिने तेल वाहिले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर महिला तेथून तातडीने निघुन गेली. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. 
महिलेने चौथऱ्यापर्यंत प्रवेश केल्याने ग्रामस्थांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. सुरक्षा यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे हे घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे संबंधित महिला पुण्याहून आल्याची माहिती आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासणी करुन अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र तिने जाणूनबुजून हे कृत्य केलं की अनवधानाने याबाबत कुठलाही खुलासा झालेला नाही.