शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षानंतर पांगरी नवघरेत निघणार बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक

By admin | Updated: November 5, 2016 00:04 IST

१४ एप्रिल २००७ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीत वाद झाल्यानंतर आतापर्यंत पांगरी नवघरे येथे मिरवणूक निघाली नाही.

ऑनलाइन लोकमत

मालेगाव (वाशिम) , दि. 04  - १४ एप्रिल २००७ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीत वाद झाल्यानंतर आतापर्यंत पांगरी नवघरे येथे मिरवणूक निघाली नाही. आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिलेल्या निर्णयानुसार ५ नोव्हेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात पांगरी नवघरे गावात बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मिरवणूक निघणार आहे.
मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे ३८०० लोकसंख्या असून, त्यामध्ये ५०० लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. येथे १४ एप्रिल २००७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत दोन गटांत वाद झाला होता. त्यावेळी दोन्ही गटांतील नागरिकांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत पांगरी नवघरे येथे मिरवणूक निघाली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पांगरी नवघरे येथे १४ एप्रिल २०१६ रोजी मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून ५ एप्रिल रोजी प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला. मात्र, कायदा व सुव्यवस्थेतचा प्रश्न समोर करून मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आली. या पृष्ठभूमीवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात मिरवणुकीला परवानगी मिळावी म्हणून अपिल दाखल करण्यात आले. विद्यमान न्यायालयाने पांगरी नवघरे येथे मिरवणूक काढण्याची परवानगी दिल्याने, ५ नोव्हेंबर रोजी मिरवणूक निघणार आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.