शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरानंतर पौंध आदिवासीवाडी प्रकाशमान

By admin | Updated: November 4, 2016 02:34 IST

पौंध आदिवासीवाडीतील ट्रान्सफॉर्मरमध्ये नवरात्रौत्सवात बिघाड झाल्याने ही आदिवासीवाडी महिनाभर अंधारात होती.

मोहोपाडा : पौंध आदिवासीवाडीतील ट्रान्सफॉर्मरमध्ये नवरात्रौत्सवात बिघाड झाल्याने ही आदिवासीवाडी महिनाभर अंधारात होती. येथील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याची तक्रारही ग्रामस्थांनी वीज वितरणकडे केली होती. परंतु वीज वितरणकडूनही दुर्लक्ष होत असल्याने दिवाळी सणही ग्रामस्थांना अंधारातच साजरा करावा लागला. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आले. या वृत्तामुळे महावितरणला जाग आली. येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आल्याने महिन्याभरानंतर आदिवासीवाडीत वीजपुरवठा पूर्ववत झाला.पौंध येथील आदिवासी बांधव डोंगराळ दुर्गम अशा भागात वास्तव्य करीत असल्याने या भागात सर्प, विंचूदंश झाल्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यात येथे वीज नसल्याने आदिवासी बांधवांचे हाल होत असत. येथील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झालेल्याला महिना लोटला असतानाही वीज वितरण याकडे डोळेझाक करीत असल्याचे लक्षात येताच ‘लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिध्द करण्यात आले. खालापूर वीज वितरणचे सहाय्यक अभियंता विजेंद्र मानकर यांच्याशी संपर्कसाधून याबाबत विचारणा केली. यानंतर महावितरणला जाग आली आणि खालापूर सहा.अभियंता विजेंद्र मानकर यांनीही त्वरित मदत देत भिंगारी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केली. गुरु वारी ३ नोव्हेंबर रोजी पौंध आदिवासी वाडीत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविल्याने आदिवासी बांधवांना आनंद झाला आहे. (वार्ताहर)‘लोकमत’चे मानले आभार : पौंध आदिवासी वाडीत गुरु वारी ३ नोव्हेंबर रोजी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविल्याने आदिवासी बांधवांना आनंद झाला आहे. महिन्यापेक्षा जास्त वेळ अंधारात दिवस काढलेल्या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला. त्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. आता रात्री अंधारात चाचपडावे लागणार नाही, अशी प्रतिक्रिया येथील आदिवासी बांधवांनी व्यक्त के ली.