शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी हल्ल्यानंतर नेटिझन्समध्ये राष्ट्रभक्तीचे उधाण

By admin | Updated: September 30, 2016 03:50 IST

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधानांनीही दखल घ्यावी इतपत आक्रोश व्यक्त करणाऱ्या आणि सरकारने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडण्याचे संयमी

मुंबई : उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधानांनीही दखल घ्यावी इतपत आक्रोश व्यक्त करणाऱ्या आणि सरकारने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडण्याचे संयमी धोरण जाहीर केल्यावर नाराज झालेल्या नेटिझन्समध्ये लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’नंतर मात्र गुरुवारी राष्ट्रभक्तीचे उधाण आले. उरीच्या हल्लेखोरांना चोख उत्तर देण्याचे वचन सरकारने पाळल्याबद्दल समाधान व्यक्त करीत असतानाच समाजमाध्यमांमधून लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.गुरुवारचा संपूर्ण दिवस टिष्ट्वटरवर ‘हॅशटॅग सर्जिकल स्ट्राईक’ हा ट्रेंड राहिला आणि रात्रीपर्यंत ‘इंडियन आर्मी’चे अभिनंदन करणाऱ्या टष्ट्वीट्सची संख्या दोन लाखांच्या जवळपास पोहोचली. एकंदर फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅपवरवर आलेल्या यासारख्या असंख्य नोटिफीकेशन आणि चित्र-संदेशांनी नेटिझन्सचे मोबाईल खणखणत राहिल्याने भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तराचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत होते.उरी हल्ल्याबाबत प्रचंड हळहळ व्यक्त करणाऱ्या नेटिझन्समध्ये स्ट्राईक्सचे वृत्त समजताच अभिमानाची आणि अभिनंदनाची भावना जागृत झाली. भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत स्ट्राईकची माहिती दिली. त्यानंतर काही वेळात हे वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. (प्रतिनिधी)बॉलिवूडमध्येही आनंदभारतीय जवानांच्या पाठीवर बॉलिवूडनेही शाबासकीची थाप दिली. नेटिझन्स म्हणून सक्रिय असलेल्या बॉलिवूडच्या अनेक मान्यवरांनी अभिनंदन, कौतूक आणि समाधानाची भावना व्यक्त केली. बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरु ख याने कौतुक करताना म्हटले की, भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई ही कौतुकास्पद आहे. भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात कारवाई केली, त्याबद्दल धन्यवाद ! जवानांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी मी प्रार्थना करेन. शाहरु खसह, आशा भोसले, वरु ण धवन यांनी देखील भारतीय जवानांचे कौतुक केले आहे.‘दसऱ्या आधी सीमोल्लंघन करत दिवाळी आधीच फटाके फोडल्याने भारतीय सैन्याचे खुप खुप आभार, अशा शब्दांत नेटिझन्सने शुभेच्छा देत लष्कराचे अभिनंदन केले. शिवाय काही नेटिझन्सनी आपल्या डिपीमध्ये तिरंग्याला सलाम करणाऱ्या सैनिकांच्या छायाचित्राला स्थान दिले. तर काही नेटिझन्समध्ये ‘पाकमध्ये स्वच्छता मोहिमेला सुरुवात-पंतप्रधानांची घोषणा...’ अशा स्वरुपात पाकची खिल्ली उडवणारे संदेश व्हायरल झाले. नेते, अभिनेते, खेळाडू या सर्वांनी आपआपल्या पद्धतीने सोशल मिडियावर व्यक्त होत भारतीय सैन्याचे कौतुक केले.