शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीच्या मृत्यूनंतर दंडाची वसुली त्याच्या वारसांकडून!

By admin | Updated: February 25, 2016 03:01 IST

फौजदारी खटल्यात झालेला दंड न भरता आरोपीचा मृत्यू झाला, तरी दंड भरण्याची त्याची जबाबदारी संपत नाही. अशा दिवंगत आरोपीचा दंड त्याच्या वारसांकडून वसूल केला जाऊ शकतो

मुंबई : फौजदारी खटल्यात झालेला दंड न भरता आरोपीचा मृत्यू झाला, तरी दंड भरण्याची त्याची जबाबदारी संपत नाही. अशा दिवंगत आरोपीचा दंड त्याच्या वारसांकडून वसूल केला जाऊ शकतो व वारसांनी दंडाची रक्कम स्वत:हून अदा न केल्यास, त्यांच्या मालमत्तेचा लिलाव पुकारूनही ती वसूल केली जाऊ शकते, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.फौजदारी खटल्यात आरोपीला झालेली तुरुंगवासाची शिक्षा त्याच्या मृत्यूने संपुष्टात येते व शिल्लक राहिलेली किंवा न भोगलेली शिक्षा त्याच्या वारसांना भोगावी लागत नाही. मात्र, दोषी ठरलेल्या आरोपीस न्यायालयाने दंड ठोठावला असेल किंवा भरपाई देण्याचा आदेश दिला असेल, तर ही रक्कम भरण्याची जबाबदारी आरोपीच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांवर येते, असे न्या. डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी यांनी हा निकाल देताना स्पष्ट केले.न्यायालयाच्या या निकालामुळे श्रीवर्धनच्या सरखोत मोहल्ल्यात राहणाऱ्या शमीम सैफुद्दीन सरखोत या ५५ वर्षांच्या विधवेस, तिच्या दिवंगत पतीचा वारस या नात्याने त्याने त्याच्या हयातीत चुकती न केलेली २.८२ लाख रुपयांची भरपाई चुकती करावी लागणार आहे. तिने ही रक्कम न भरल्यास, रायगडचे जिल्हाधिकारी तिच्या मालमत्तेचा लिलाव पुकारूनही भरपाईची ही रक्कम वसूल करू शकतील. श्रीमती शमीम यांचे दिवंगत पती सैफुद्दीन यांच्यावर, श्रीवर्धन येथीलच एक व्यापारी जयराज मियाचंद जैन यांनी चेक न वटल्याबद्दल, ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट््स अ‍ॅक्ट’च्या कलम १३८ अन्वये खटला दाखल केला होता. श्रीवर्धनच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या खटल्यात सैफुद्दीन यांना दोषी ठरविले व त्यांनी सरकारला दंड म्हणून २५ हजार रुपये व तक्रारदार जैन यांना भरपाई म्हणून २.८२ लाख रुपये द्यावे, असा आदेश दिला. सैफुद्दीन यांनी दंड किंवा भरपाई न भरता उच्च न्यायालयात अपील केले. हे अपील प्रलंबित असताना, सैफुद्दीन यांचे निधन झाले. अपील चालविण्यासाठी त्यांचे कोणी वारस पुढे न आल्याने, ते अपील निरस्त झाले. या पार्श्वभूमिवर जैन यांनी भरपाई वसुलीसाठी श्रीवर्धन न्यायालयाकडे पुन्हा अर्ज केला. भरपाईची रक्कम सैफुद्दीन यांच्या विधवेकडून वसूल केली जावी व गरज पडल्यास, ही वसुली जिल्हाधिकाऱ्यांनी विधवेच्या मालमत्तेचा लिलाव पुकारून करावी, असा आदेश स्थानिक न्यायालयाने दिला. याविरुद्ध शमीम सरखोत यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती. जैन यांना द्यायच्या भरपाईची वसुली त्यातून केली जाऊ शकत नाही, असा त्यांचा मुख्य मुद्दा होता. मात्र, न्यायालयाने तो अमान्य करून श्रीवर्धन न्यायालयाचा निकाल कायम केला. (विशेष प्रतिनिधी)याविषयी कायदा काय म्हणतो?न्यायालयाने हा निकाल देताना कायद्यातील ज्या तरतुदींचा आधार घेतला, त्या अशा-दंड प्रक्रिया संहिता कलम ४२१ - न्यायालयाने ठोठावलेला दंड आरोपीने न भरल्यास, त्याच्या मालमत्तेचा लिलाव करून दंडाची वसुली केली जाऊ शकेल.दंड प्रक्रिया संहिता कलम ४३१ - न्यायालयाने भरपाई देण्याचा आदेश दिला असेल, तर भरपाईची वसुलीही दंडाप्रमाणे करता येईल.भारतीय दंड विधान कलम ७० - न्यायालयाने ठोठावलेला दंड भरण्याची जबाबदारी आरोपीच्या मृत्यूने संपुष्टात येत नाही. आरोपीच्या पश्चात त्याची मालमत्ता ज्या वारसांकडे जाईल, त्यांच्याकडूनही ही वसुली करता येईल.