शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीसमोरील दान पेटी चोरणाऱ्याला दोन तास ठेवले बांधून, फोटो झाला व्हायरल

By admin | Updated: September 11, 2016 20:23 IST

कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील चिकनघर परिसरातील सार्वजनिक गणशोत्सव मंडळाच्या मंडपातून दानपेटीची चोरी करताना एका चोरटय़ाला मंडळाच्या कार्यकत्र्यानी पकडले.

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. ११ : शहराच्या पश्चिम भागातील चिकनघर परिसरातील सार्वजनिक गणशोत्सव मंडळाच्या मंडपातून दानपेटीची चोरी करताना एका चोरटय़ाला मंडळाच्या कार्यकत्र्यानी पकडले. त्याला एका खांबाला दोन तास बांधून ठेवले. तसेचत्याला मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. महात्मा फुले पोलिसांनी चोरटय़ाला अटक केली आहे. त्याचे नाव दीपक नारायण जाधव (20) असे आहे. चोरटय़ाला खांबाला बांधल्याचा फोटोच व्हाटस्अपवर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी चोरटय़ाला बांधून ठेवल्याविषयी अधिक माहिती आपणास माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ही घटना दोन दिवसापूर्वीची आहे. मात्र ती व्हाटस्अपवर व्हायरल झाल्याने आज ती उजेडात आली आहे. चिकनघरचा राजा हेसार्वजनिक गणोशोत्सव मंडळ दरवर्षी गणपती बसवते. दोन दिवसापूर्वी पहाटेच्या वेळी दर्शन घेण्याच्या निमित्ताने दीपक मंडपात शिरला. त्याने दान पेटी चोरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा प्रकार मंडपात उपस्थित असलेल्या मंडळाच्या काही कार्यकत्र्यानी पाहिला. त्याला त्यांनी ताब्यात घेतले. त्याला एका खांबाला दोन तास बांधून ठेवले. तसेच त्याला मारहाण केली.

त्यानंतर दीपकला पोलिसांच्या हवाली केले. त्याला खांबाला बांधून ठेवल्याचा फोटोच व्हॉटसअपवर व्हायरल केला. फोटो व्हायरल होण्यापूर्वी पोलिसांनी दीपकला अटक केली आहे. दीपक हा लाल चौकी परिसरात राहणारा आहे. या प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.