शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

दीपक तेंडुलकर यांचा अर्ज बाद

By admin | Updated: November 3, 2016 02:48 IST

रोहा नगर पालिका निवडणूक रणधुमाळीस सुरुवात झाली आहे.

रोहा: रोहा नगर पालिका निवडणूक रणधुमाळीस सुरुवात झाली आहे. बुधवारी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रि येदरम्यान शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दीपक तेंडुलकर यांचे अर्ज बाद झाले. तर अर्जात त्रुटी असल्याने गौरी बाळटक्के (अपक्ष) यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यातच अर्ज भरतेवेळी संदीप तटकरेंनी सेनेचा एबी फॉर्म उमेदवारी अर्जाला जोडण्याचे संशयास्पदरीत्या टाळल्याने ते अपक्ष उमेदवार असून नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार निवडणुकीत नसल्याची नामुष्की सेनेवर आली आहे तर संदीप तटकरेंनी सेनेला बनविले असल्याचे बोलले जात असून अधिकृत उमेदवार रिंगणात नसल्याने शिवसैनिकांत नाराजी आहे. रोह्यात केवळ थोरल्या तटकरेंना शह देण्यासाठी धाकट्यांना हाताशी धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेचे हात चांगलेच पोळून निघाले आहेत. जादूची कांडी सापडावी आणि आनंद व्हावा त्यापेक्षाचा जास्त जल्लोष शनिवारी शिवसेनेला नगराध्यक्षपदासाठी तटकरेंच्या घरातला उमेदवार सापडल्यानंतर झाला. मात्र दुसऱ्या दिवशी या उमेदवाराचे नाव अपक्षांच्या यादीत बघून सर्वांनाच धक्का बसला. अर्ज भरताना तांत्रिक चूक झाल्याचे शिवसेना आता सांगत असली तरी तटकरेंना साधा अर्जही भरता येऊ नये यावर कोणाचाही विश्वास नाही. त्यामुळे धाकट्यांनीही शिवसेनेला टांग दिल्याची चर्चा अर्ज छाननीत दीपक तेंडुलकर यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज बाद झाल्यानंतर शहरात सुरू होती. सेनेच्या नेत्यांना साधा पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म तटकरे यांच्या उमेदवारी अर्जाला जोडता आला नाही, हा केवळ योगायोग नसावा असे समजते आहे. सेनेच्या नेत्यांनी यारी दोस्ती जपल्याचा परिणाम या निवडणुकीत सेनेला भोगावा लागत असल्याचे बोलले जात आहे. सेनेसह काँग्रेसकडून असलेले अपक्ष उमेदवार हेमंत साळवी यांचाही अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. आत्ता यामुळे ही निवडणूक चुरशीची होते का? हे पहावे लागणार आहे. बुधवारी अचानक यात काही अनपेक्षित बदत झाल्याचे पहावयास मिळाले. यामुळे आता रोहेकरांचे लक्ष या नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे लागले आहे. मात्र याचे चित्र योग्य वेळीच स्पष्ट होणार आहे.