शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

अखेर लाचखोर अधीक्षक निलंबित

By admin | Updated: November 2, 2016 05:42 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट वरिष्ठ अधिकारी विजय पिराजी चिंचाळकर याला अखेर खात्यातून निलंबित करण्यात आले

मुंबई : न्यायालयाने दोषी ठरविलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट वरिष्ठ अधिकारी विजय पिराजी चिंचाळकर याला अखेर खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात लाचखोरीच्या एका प्रकरणात सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवून पाच वर्षांची कारावसाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला. त्यानंतर त्याला शिक्षाधीन बंदी म्हणून ४८ तासांहून अधिक काळ कारागृहात राहावे लागल्याने त्याच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.रत्नागिरीत पाच लाखांची लाच घेताना सापडलेल्या चिंचाळकरला कोल्हापूरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकपदी पोस्टिंग देण्यात आली होती. अखेर रत्नागिरी सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरविल्याने त्याचे निलंबन करणे भाग पडल्याचे सांगितले. लाचखोरीच्या प्रकरणात शिक्षा झालेला विभागातील पहिला वरिष्ठ अधिकारी आहे.पाच आॅक्टोबरला सत्र न्यायालयाने लाच प्रकरणात त्याला दोषी ठरवत ५ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड ठोठाविला. त्यानंतर त्याची रत्नागिरी कारागृहात रवानगी करण्यात आली. पाच दिवसांनंतर त्याची जामीनावर मुक्तता झाली. मात्र ४८ तासाहून अधिककाळ शिक्षा व तितक्याच काळाहून अधिक कारागृहात राहावे लागल्याने त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये नियम ४ च्या पोटनियम (४) (२)तरतुदीनुसार त्याची दोषी ठरलेल्या दिनांकापासून निलंबन करण्यात आले. त्याबाबतचा आदेश गृहविभागाने नुकताच बजाविला आहे. (प्रतिनिधी)>रत्नागिरीत रंगेहाथ पकडलेविजय चिंचाळकर याने रत्नागिरी येथे अधीक्षक असताना लाच स्वीकारताना त्याला एसीबीने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर दोन वर्षांचा निलंबन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची चंद्रपूरला अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.