शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

६९ वर्षानंतर सुपरमून पाहण्याची आज आहे सुवर्णसंधी

By admin | Updated: November 14, 2016 17:25 IST

पृथ्वीभोवती एक महिन्यात एक प्रदक्षिणा करणारा चंद्र दररोज विविध कलांच्या माध्यमातून १२ अंश या प्रमाणात फिरतो.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १४ - पृथ्वीभोवती एक महिन्यात एक प्रदक्षिणा करणारा चंद्र दररोज विविध कलांच्या माध्यमातून १२ अंश या प्रमाणात फिरतो. आपल्या कक्षेतून भ्रमण करताना चंद्र व पृथ्वी यातील अंतर कमी-अधिक होत असल्याने चंद्रप्रकाशातही बदल होत असतो. आज कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी व चंद्र यामधील अंतर सर्वात कमी राहणार असून, चंद्रबिंब मोठ्या आकाराचे दिसणार आहे. या खगोलिय चमत्काराचा आनंद अवकाश निरीक्षकांनी लुटावा, असे आवाहन निसर्ग शिक्षण कार्यसंस्थेचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.
 
एकंदर ८८ तारकासमुहांच्या आकाशात विविध मनोहारी घटना अधूनमधून घडत असतात. या घटना पाहण्याची इच्छा खगोल प्रेमींना असते. याआधी चंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ येण्याची घटना १९४८ मध्ये घडली होती. यापुढे ही स्थिती २०३४ मध्ये पहावयास मिळणार आहे. आपला चंद्र प्रत्येक राशीत २ पूर्णांक एक चतुर्थांश दिवस मुक्कामी राहून एका महिन्याच्या कालावधीत संपूर्ण १२ राशींचे चक्र पूर्ण करतो. यामुळे आकाशातील प्रत्यक्ष दिसणाऱ्या राशींची माहिती व त्यांच्या दर्शनाचा आनंद देण्यास चंद्र मदतच करतो. याच राशी चक्रातून सर्व ग्रह फिरत असल्याने दरमहा चंद्र प्रत्येक ग्रहाजवळ येतो. यालाच आपण चंद्राची त्या ग्रहसोबत युती झाल्याचे संबोधतो. चांद्र मासातील प्रत्येक पौर्णिमेला चंद्र हा त्या-त्या नक्षत्रात बघता येऊ शकतो. तसाच तो या कार्तिक पौर्णिमेला आकाशातील कृतिका या नक्षत्राजवळ पाहता येईल.
 
सुपरमूनचा घ्या अनुभव
 
या घटनेलाच सुपरमूनसुद्धा म्हटल्या जाते. या स्थितीत पृथ्वी व चंद्र यामधील अंतर केवळ ३ लाख ५० हजार किलोमिटर एवढे कमी असते. त्यामुळे चंद्राचा लख्ख प्रकाश पृथ्वीवर पडतो. या खगोलीय घटनेचा अनुभव घेणे निश्चितच अवर्णनिय राहणार आहे.
 
- ही खगोलीय घटना ६९ वर्षांनंतर होत आहे. कार्तिक पौर्णिमेला चंद्र व पृथ्वी यामधील अंतर कमी होऊन, चंद्र बिंब मोठे दिसणार आहे. दुर्मिळ असलेली ही स्थिती प्रत्येकाने अनुभवली पाहिजे. - प्रभाकर दोड, खगोल अभ्यासक, अकोला