शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

१० महिन्यानंतर लातूर शहराला नळाने पाणीपुरवठा....

By admin | Updated: July 31, 2016 14:43 IST

गेल्या सहा महिन्यापासून लातूर शहराचा नळाने होणारा पाणीपुरवठा बंद केला होता. मागच्या दोन दिवसासून पडलेल्या पावसामुळे मांजरा नदीत पाणी साठल्याले नळाचे पाणी पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. ३१ : गेल्या सहा महिन्यापासून लातूर शहराचा नळाने होणारा पाणीपुरवठा बंद केला होता. परंतु मागच्या दोन दिवसासून पडलेल्या पावसामुळे मांजरा नदीत पाणी साठल्याले नळाचे पाणी पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रविवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक झाली. त्यात येत्या ४८ तासात नळाने पाणी देण्यासंदर्भातचा निर्णय घेण्यात आला.

पाणीटंचाईने देशभरात गाजलेल्या लातूरकरांसाठी आनंदाची बातमी येत आहे. गेली सहा महीने लातूरच्या प्रत्येक घराला टँररने पाणी देण्यात येत होते. निन्म तेरणा प्रकल्पातून दररोज २५ लाख लिटर आणि मिरजेहून वारणेतील दररोज २५ लाख लिटर असे ५० लाख लिटर पाणी शहरासाठी यायचे. हे पाणी जलशुध्दीकरण केंद्रातून प्रतिकुटुंब २०० लिटरप्रमाणे सुरूवातीली ७० आणि त्यांतर टँकपचा आकडा दुप्पट म्हणजे १४० टँकरने वाटप केले जायचे. पावसाळ्याचे दोन महिने चांगले गेले तरी धरणे आणि तलाव कोरडेच असल्याने लातूरकरांचे धाबे दणाणले होते. परंतु मागच्या दोन दिवसात पडलेल्या तुफान पावसामुळे तेरणा आणि मांजरा धरणीतील पाणीसाठा वाढला आहे.

त्यात निजामकालीन योजना असलेल्या मांजरा धरणातील नागझरी साई प्रकल्पात चांगले पाणी थांबले आहे. थोड्याशा प्रयत्नाने लातूरला पाणी येऊ शकते हे समजताच महापालिकेच्या स्थायी समितीची रविवारीही तातडीची बैठक झाली. पाणीपुरवठा कर्मचार्यांचा सल्ला घेऊन आता लातूरला प़़नळांने पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे स्थायी समितीचे चेअरमन विक्रांत गोजमगुंडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. रेल्वे सुरू ठेवणार की नाही हे गुलदस्त्यात मांजरा नदीत पाणी साठले असले तरी मांजरा धरण मात्र अद्याप कोरडे आहे. २२९ एमएमक्युब क्षमतेच्या या धरणातून लातूरला नियमित पाणीपुरवठा केला जातो. त्यातला पाणीसाठा वाढायला तयार नाही. सध्या ३१ ऑगस्टपर्यंत मिरजेहून येणार्या जलपरीला मुदतवाढ मिळाली आहे. नळाने पाणीपुरवठा करताना सध्या या जलपरीसह निम्न तेरणातून येणारे २५ लाख लिटर गृहीत धरण्यात आले आहे.