शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकाला लालफितशाहीचा फटका!

By admin | Updated: August 27, 2014 01:02 IST

जनगणनेसारख्या राष्ट्रीय कामात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जाहीर झालेले पदक गत सहा महिन्यांपासून प्राप्त झाल्यावरही संबंधित कर्मचाऱ्यास सन्मानपूर्वक प्रदान करून त्याचा गौरव करण्याचे सौजन्यही

उत्कृष्ट कामगिरी : पदक जाहीर होऊनही प्रदान केले नाहीचंद्रशेखर बोबडे - नागपूरजनगणनेसारख्या राष्ट्रीय कामात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जाहीर झालेले पदक गत सहा महिन्यांपासून प्राप्त झाल्यावरही संबंधित कर्मचाऱ्यास सन्मानपूर्वक प्रदान करून त्याचा गौरव करण्याचे सौजन्यही स्थानिक महसूल प्रशासनाने न दाखविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.विशेष म्हणजे, गत २६ जानेवारीलाच या पदकाचे सन्मानपूर्वक वाटप करायचे होते. पण प्रशासकीय हेवेदाव्यामुळे ते होऊ शकले नाही. यावेळी १५ आॅगस्टचा मुहूर्त ठरला. पण दोनपैकी एकाच अधिकाऱ्याला ते देण्यात आले. कर्मचाऱ्याचे कौतुक करतानाही प्रशासनाने आखडता हात घेतल्याने नाराजीचे सूर उमटले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ च्या राष्ट्रीय जनगणनेत सर्वात चांगले काम नागपूर जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याबद्दल जनगणना संचालनालयाच्या केंद्रीय कार्यालयाने या कामगिरीसाठी २०१३-१४ या वर्षात ५६ कर्मचाऱ्यांची विशेष पदकासाठी निवड केली होती. यात तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार, शिक्षक आणि इतरही कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जानेवारीत ही पदके जिल्हा कार्यालयाला प्राप्त झाली होती. ती २६ जानेवारीला वाटप करायची होती. ग्रामीण भागातील पदके त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी विशेष कार्यक्रम घेऊन ती सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. नागपुरातील दोन पदकांचे वाटप गणतंत्रदिनी करायचे होते. ही दोन पदके तत्कालीन उपनिवासी जिल्हाधिकारी प्रमोद भुसारी आणि तहसीलदार मनोहर पोटे यांना जाहीर झाली होती. पण प्रशासकीय हेवेदावे आड आले आणि पदकाचे वाटप टाळण्यात आले. ही पदके जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली.