शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

एकाच गावात ‘मुद्रा’चा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 02:40 IST

अकोला जिल्हय़ात ३९ हजार लाभार्थी तर पळसो बढे येथे तब्बल १८३ लाभार्थी.

अकोला, दि. १५- बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्राने सुरू केलेली मुद्रा योजना बँकांसाठी अनास्थेचा विषय असला, तरी जिल्हय़ातील एका गावात तब्बल १८३ लाभार्थ्यांना कर्ज वाटप केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे हा प्रकार संशयास्पद असून, त्याला प्रतिबंध घालण्याची मागणी लोकप्रतिनिधींनाच करावी लागली, हे विशेष. केंद्र शासनाने बेरोजगारांना व्यवसाय निर्मितीसाठी कर्ज देण्याची योजना ह्यमुद्राह्ण सुरू केली. कर्जाच्या वाढत्या रकमेनुसारही नामकरण केले. त्यामध्ये शिशू, किशोर व तरुण नावे दिल्या गेली. सुरुवातीला योजनेतून कर्ज वाटपाला बँकांची नकारघंटाच होतीच; मात्र बँकांवर वाढत्या दबावाने काही प्रकरणे मार्गी लागली. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात दलालीही झाली. अकोला तालुक्यातील पळसो बढे या गावात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने मुद्रा योजनेचे तब्बल १८३ लाभार्थी विविध व्यवसायांसाठी पात्र ठरविले. त्यांना कर्ज वाटपही करण्यात आले. लगतच्या दहिगाव आणि पळसो येथील लोकसंख्या मिळून होत असलेली ही लाभार्थी संख्या डोळे विस्फारणारी आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना कर्ज झालेल्या कर्ज वाटपाबाबत लोकप्रतिनिधींनीच शंका घेत बँकेच्या रिजनल मॅनेजर यांना लक्ष घालण्याचे सांगितले. त्यामुळे वाढत चाललेले मुद्रा योजनेचे कर्ज वाटप त्या संख्येवरच थांबविण्यात आले आहे. 'तरुण' लाभार्थी अत्यल्पयोजनेत स्वयंरोजगारासाठी व्यवसायाच्या गरजेनुसार अर्थसाहय़ दिले जाते. त्यामध्ये २0 हजार ते ५0 हजार, ५0 हजार ते अडीच लाख, तेथून पुढे दहा लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यापैकी तिसर्‍या टप्प्यातील व्यवसायासाठी कर्ज घेणार्‍या लाभार्थ्यांची संख्या अत्यल्प आहे. केवळ शिशू योजनेतच लाभार्थ्यांना गुंडाळण्यात येत असल्याचे वाटपाच्या आकडेवारीतून दिसत आहे. प्रति लाभार्थी सरासरी २६ हजारांचे वाटपजिल्हय़ात मुद्रा योजनेचे लाभार्थी आणि कर्ज वाटपाची रक्कम पाहता प्रति लाभार्थी सरासरी २६९२३ रुपये वाटप झाल्याचे दिसत आहे. त्यातून या लाभार्थ्यांना केवळ शिशू योजनेतच गुंडाळल्याचीही माहिती आहे. किशोर आणि तरुण योजनेसाठी अत्यल्प लाभार्थी असल्याचीही माहिती आहे.