शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: June 24, 2016 01:47 IST

संत ज्ञानेश्वरमहाराज आषाढी पायी वारी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आळंदी नगर परिषदेच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी हाती घेण्यात आलेली सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

आळंदी : संत ज्ञानेश्वरमहाराज आषाढी पायी वारी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आळंदी नगर परिषदेच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी हाती घेण्यात आलेली सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. प्रदक्षिणा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण होत आले आहे. शहरात विभागवार चोवीस तास पाणीपुरवठा येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. इंद्रायणी घाटासह शहरातील प्रमख वर्दळीच्या रस्त्यांवर सुमारे ७५ लाख रुपये निधीतून एलईडी दिवे नव्याने बसविण्यात येत आहेत. पोलीस प्रशासनाकडून शनिवारपासून अवजड वाहनांना आळंदीतून प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. पालखी सोहळा प्रस्थान काळात प्रमुख मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. ते परिसराच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून असणार आहेत. बंदोबस्तासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेतच शंभराच्यावर पोलीस नेमण्यात आले असून, ते शनिवारपासून आळंदीत बंदोबस्त पाहणार आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन उपविभागीय पोलीस अधिकारी, वीस पोलीस निरीक्षक, साठ पोलीस उपनिरीक्षक, पाचशे पोलीस जवान व महिला, चारशे होमगार्ड, गुन्हे शाखेचे दोन अधिकारी व वीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात राहणार आहे. वारीकाळात ‘स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून, थर्माकोल पत्रावळी, प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे पथक शहरातील व्यापऱ्यांकडील प्लॅस्टिक पिशव्या आणि थर्माकोलच्या पत्रावळी जप्त करणार आहे. भाविक-वारकऱ्यांनी कागदी पत्रावळीचा वापर करावा, शहरात उघड्यावर कचरा न टाकता पालिकेच्या घंटागाडीत टाकावा, असे आवाहन करण्यात येत आहे. स्वच्छतेसाठी पालिकेने जादा कर्मचारी नेमले आहेत. रात्रीच्या वेळी गर्दी नसेल तेव्हा रस्त्यावरील कचरा उचलला जाणार आहे. उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार टाळण्यासाठी राज्य सरकारच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून शहरात विविध चौदा ठिकाणी सुमारे साडेपाचशे शौचालये उभी केली आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यंदा तात्पुरती, फायबरची पाचशे शौचालये उभारण्यात येत आहेत. शौचालयांच्या स्वच्छतेसाठी खासगी संस्था काम करणार आहेत. वारीकाळात शौचालये मोफत ठेवली जाणार आहेत. वारीकाळात येत्या २५ तारखेपासून पिंपरी महापालिकेचे पिण्याचे पाणी देहूफाटा, काळेवाडी परिसरातील नागरिकांना पुरविण्यात येईल. (वार्ताहर)