शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलांना मातृभाषेतून शिक्षण !

By admin | Updated: November 12, 2015 03:08 IST

राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांतील १० बोली भाषा लिपिबद्ध करण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू केले असून, आदिवासी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी शिक्षक बोली भाषेचे धडे गिरविणार आहेत

पुणे : राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांतील १० बोली भाषा लिपिबद्ध करण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू केले असून, आदिवासी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी शिक्षक बोली भाषेचे धडे गिरविणार आहेत. बोली भाषांमधील शब्दकोषही तयार केला जाणार आहे.आदिवासी बोली भाषेतील वाक्यांचे भाषांतर देवनागरीत करून ‘खेळच खेळ’ आणि ‘ओढ्याकाठी’ या दोन पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांतील दरी कमी करण्यासाठी हे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे आदिवासी भागातील शिक्षकांना या पुस्तकांतील धडे गिरवावे लागणार आहेत.आदिवासी भागातील पहिली व दुसरीच्या वर्गातील मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यास त्यांची आकलनशक्ती वाढीस लागेल. परिणामी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती कमी होईल, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने १० आदिवासी बोली भाषेतील संवाद पुस्तिका तयार केल्या आहेत. वारली, पावरी, भिलोरी, कातकरी, नहाली, गोंडी, कोलामी, परधान, कोरकू आणि मावची बोली भाषांमध्ये बोलल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या वाक्यांचा समावेश ‘खेळच खेळ’ आणि ‘ओढ्याकाठी’ या दोन पुस्तिकांमध्ये करण्यात आला आहे. बोली भाषेतील वाक्यांसमोर देवनागरी भाषेतील वाक्ये असतील. त्यामुळे बोली भाषेतील कोणत्या वाक्याचा अर्थ काय, हे शिक्षक व विद्यार्थ्यांना समजू शकेल.राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १६ जिल्ह्यांमध्ये आदिवासी बोलीभाषा बोलल्या जातात. त्यात ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, पुणे, अहमदनगर, नांदेड, रायगड जिल्ह्यांचा समावेश आहे. आदिवासी जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात. मात्र सध्या बोली भाषेतील १० पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)