शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

मुरुड तालुक्याला अतिरिक्त वीजपुरवठा

By admin | Updated: September 5, 2016 03:05 IST

सध्या मुरुड तालुक्याला सुपेगाव-कोकबन, धाटाव-रोहा व भालगाव येथून वीजपुरवठा होत असतो.

नांदगाव/ मुरुड : सध्या मुरुड तालुक्याला सुपेगाव-कोकबन, धाटाव-रोहा व भालगाव येथून वीजपुरवठा होत असतो. या वीजवाहिन्या घनदाट जंगलातून गेलेल्या आहेत. त्यामुळे पावसाच्या दिवसात झाडांची फांदी अथवा तत्सम कारणाने अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असतो. एकदा का वीज गायब झाली की वीजवाहिनी घनदाट जंगलातून असल्याने सहा ते सात तास वीज न आल्याने शहरी व ग्रामीण भागातील जनता नेहमीच त्रस्त असते. ही परिस्थती लक्षात घेऊन आमदार पंडित पाटील यांनी पाठपुरावा केल्यानेमुरु ड तालुक्यातील काही भागाला अतिरिक्त पुरवठा होण्यासाठी व गणपती उत्सवात ओरड होऊ नये या पार्श्वभूमीवर तळा तालुक्यातील मांदाड गावातील फिडरवरून वीज देण्यात आली आहे. यासाठी ३३ केव्ही अंडर ग्राऊंड केबल कायमस्वरूपी टाकण्यात आली आहे. त्यामुळे जर काही कारणास्तव वीज गेल्यास आता या भागातून त्वरित वीजपुरवठा केला जाणार आहे.येथून वीजपुरवठा झाल्याने मुरु ड शहर, आगरदांडा, खार आंबोली, शिघ्रे आदी भागाला बत्ती गुलपासून दिलासा मिळणार आहे. वीजवाहिनी लोकार्पण सोहळा नुकताच आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत, मोतीराम पाटील, विजय गिदी, विनायक धामणे, मुरु ड वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर आदी उपस्थित होते. यावेळी मुरु ड वीज मंडळाचे उप मुख्यकार्यकारी अभियंता सचिन येरेकर म्हणाले की, जर मुरु डला होणारा वीजपुरवठा धाटाव-रोहा येथून खंडित झाला तर त्वरित नव्याने काम झालेले मांदाड फिडर येथून वीज घेता येणार आहे. मांदाड फिडरमुळे कमी दाबाने होणारी वीज समस्या कायमस्वरूपी नष्ट होणार आहे. मुरु ड सबस्टेशनचे काम परिपूर्ण होईपर्यंत ही सुविधा ग्राहकांना मिळणार असल्याचे येरेकर यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)>मुरु डला होणारा वीजपुरवठा धाटाव-रोहा येथून खंडित झाला तर आता त्वरित नव्याने काम झालेले मांदाड फिडर येथून वीज घेता येणार आहे, अशी माहिती वीज मंडळाचे उप मुख्यकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी सांगितली.