शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याची चिमुकली अ‍ॅक्टर बनली ‘डान्स प्लस-२ शो’ची जज!

By admin | Updated: September 30, 2016 12:10 IST

या अकोल्यातील बालकलाकार समृद्धी कृष्णा आसरकर हिने डान्स प्लस-२ सिजनची सुपर जज म्हणून काम केले.

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि,  ३० -  महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘मन में है विश्वास’ शोमध्ये मुख्य भूमिका करणा-या अकोल्यातील बालकलाकार समृद्धी कृष्णा आसरकर हिने पुन्हा आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. चिमुकल्या समृद्धीला प्रसिद्ध विनोदी अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री नर्गिस फक्री, कोरिओग्राफर रेमो डिसुजा, धर्मेश, भक्ती आणि पूनीत यासारख्या सेलिब्रेटींसोबत एका चॅनलवरील डान्स प्लस-२ सिजनची सुपर जज म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. डान्स प्लस-२ मध्ये सहभागी झालेल्या कलावंतांच्या नृत्याचे चिमुकल्या बालकलाकार समृद्धीने परीक्षण केले आणि आपला अभिप्रायसुद्धा दिला. 
समृद्धी रामदासपेठ येथे राहणारे विवेक आसरकर, ज्योती आसरकर यांची नात. समृद्धीचे वडील कृष्णा आसरकर हे बांधकाम व्यवसायानिमित्त नागपूरला स्थायिक झाले आहेत. समृद्धी ही बालपणापासून दिसायला गोरीगोमटी, गोंडस, गोजिºया परीसारखी. तिच्या चेहºयावरील हावभाव, बोलक्या डोळ्यांंमुळे सहजच कुणीही तिच्याकडे आकर्षित होतो. अशातच चिमुकल्या समृद्धीला उपजतच अभिनयाची देण मिळाली. समृद्धी ही पहिल्या वर्गामध्ये शिकते. बालवयातच समृद्धीने लिटिल स्टार कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊन अवॉर्ड पटकावला. इंडियन फॅशन वीकमध्येही समृद्धीचे कौतुक झाले. एवढेच नाही तर तिला महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. समृद्धी ही उत्कृष्ट निवेदक आहे. तिच्या संवाद फेकीची शैली लक्षवेधक आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुजा याने समृद्धीला एका चॅनलवरील डान्स प्लस-२ शोसाठी चिमुकल्या समृद्धीला सुपर जज म्हणून आमंत्रित केले होते. समृद्धीने प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची बँजो चित्रपटातील अभिनेत्री नर्गिस फक्री, कोरिओग्राफर धर्मेश, भक्ती व पूनीत यासारख्या सेलिब्रेटींसोबत शोमधील सहभागी कलावंताच्या नृत्याचे परीक्षण केले. यावेळी रितेश देशमुख, नर्गिस फक्री, रेमो डिसुजासोबत दंगामस्तीही केली. तिच्या गुणवत्ता आणि कला पाहून रितेश देशमुख, रेमोने तिचे भरभरून कौतुक केले. बालवयातच समृद्धीने प्रसिद्ध डान्स प्लस- २ शोचे परीक्षण करण्याचा मान मिळविला. ही अकोलेकरांसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे.