शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईची हंडी राहणार रिकामीच

By admin | Updated: August 22, 2016 03:49 IST

दहीहंडीवर लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करू, असे हमीपत्र दिल्यावरच दहीहंडी आयोजकांना हंडीच्या आयोजनास पोलीस परवानगी देणार

जितेंद्र कालेकर,

ठाणे- सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवर लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करू, असे हमीपत्र दिल्यावरच दहीहंडी आयोजकांना हंडीच्या आयोजनास पोलीस परवानगी देणार आहेत. मात्र, असे हमीपत्र दिल्यानंतरही थरांची उंची व बालगोविंदांचा सहभाग याचे उल्लंघन केल्यावर न्यायालयीन अवमानाच्या गुन्ह्याखाली आयोजकांना नेमकी कोणती शिक्षा होईल, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे हा प्रकार म्हणजे आम्ही मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असा आहे. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले की, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ४ थरांपेक्षा उंच हंडी लावणार नाही, १८ वर्षांखालील गोविंदांचा समावेश करणार नाही, ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादांचे उल्लंघन करणार नाही, हंडी फोडताना खाली मॅट अंथरेन तसेच गोविंदांना लाइफजॅकेट व हेल्मेट घालण्याची सक्ती करीन, या व अशा अटींची पूर्तता करण्याचे हमीपत्र दिल्यावरच दहीहंडीच्या आयोजनाला परवानगी दिली जाणार आहे. या हमीपत्राचे उल्लंघन करणाऱ्यांवर दावा दाखल करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.कायदेतज्ज्ञांचे म्हणणे असे की, बहुतांश प्रकरणांत जेव्हा वादी व प्रतिवादी यांच्यातील खटला सुरू असताना न्यायालयीन अवमानाचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा त्या प्रकरणाची सुनावणी अपूर्णावस्थेत असते व अवमान केल्याचे सिद्ध झाले तर संबंधितांचा बचाव अग्राह्य मानला जातो. हंडीच्या प्रकरणात न्यायालयाचा अंतिम निर्णय झाला असल्याने अवमान करणाऱ्यांना बचाव अग्राह्य मानण्याचा फटका बसणार नाही. ज्या कृतीमुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे, त्याचे निराकरण करणे, गरजेचे असते. दहीहंडीच्या बाबतीत थर लावून झाल्यानंतर सहा-आठ महिन्यांनी न्यायालयात कारवाई झाली तर लावलेले थर उतरवण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे न्यायालयात माफी मागून आयोजक सुटू शकतात.>मान्यता रद्द होणार का?पोलिसांना दिलेल्या हमीपत्रातील अटींचे उल्लंघन केले तर संबंधित दहीहंडी मंडळाची मान्यता कायमची काढून घेण्याची तरतूद जर पोलिसांनी केली तरच न्यायालयाचे आदेश अमलात येणार आहेत. अन्यथा, आम्ही मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे कारवाईचे स्वरूप असेल.