शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

By admin | Updated: June 15, 2014 02:53 IST

सिंचन प्रकल्पांचा मूळ प्रशासकीय मान्यता अहवाल तयार करताना अपुऱ्या तरतुदी केल्यामुळे बांधकामाच्या वेळी १५ टक्क्यांपेक्षा अधिक बदल करावा लागला

मुंबई: सिंचन प्रकल्पांचा मूळ प्रशासकीय मान्यता अहवाल तयार करताना अपुऱ्या तरतुदी केल्यामुळे बांधकामाच्या वेळी १५ टक्क्यांपेक्षा अधिक बदल करावा लागला, असा ठपका चितळे समितीने ठेवला आहे. याबाबत राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीमार्फत सखोल तपासणी करून तथ्य आढळल्यास विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.ज्या प्रकल्पांमध्ये कालव्यांच्या अस्तरीकरणाची नव्याने तरतूद करताना भूस्तराचा योग्य अभ्यासच करण्यात आला नव्हता, असे समितीने म्हटले आहे. यासाठी जबाबदार संबंधित मुख्य अभियंत्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे. प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे अधिकार नसताना अशी मान्यता देणारे कार्यकारी संचालक आणि वित्त अधिकाऱ्यांची चौकशी.वन व पर्यावरणविषयक मंजुरी नसताना प्रकल्पाच्या कामांना सुरुवात करण्याचे प्रकार ३२ प्रकल्पांबाबत घडले. त्यासाठी संबंधित कार्यकारी अभियंत्यांची चौकशी. त्याच वेळी या मान्यतेचा विषय हा इतर खात्यांच्या अधिकाऱ्यांशी संबंधित असल्याने त्या अधिकाऱ्यांचीही चौकशी आवश्यक असल्याची भूमिका शासनाने घेतली आहे.त्यात महसूल, मदत व पुनर्वसन विभागाचा समावेश आहे.पुरेसा निधी/वित्तीय तरतूद असल्याशिवाय काम सुरू केल्यामुळे कामांना झालेल्या विलंबाबाबत कार्यकारी संचालक व मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीची शिफारस समितीने केली आहे. शासनाने ती मान्य केली आहे. प्रकल्पांच्या व्याप्तीमध्ये बदलांच्या मंजुरीबाबत झालेल्या अनियमितता याविषयी सौम्य/किरकोळ शिक्षा करण्याची समितीने केलेली शिफारस शासनाने मान्य केली.उपसा सिंचन योजनांच्या वीज बिलाचा खर्च भांडवली तरतुदीतून भागवायची अनियमितता झाली. या बबत संबंधित मुख्य अभियंत्यांना दोषी धरून सौम्य शिक्षा करणार. उपसा सिंचनासाठी ज्या ठिकाणी मुख्य अभियंत्यांनी पाणीपट्टीचे दर निश्चित केले नाहीत त्या ठिकाणीही त्यांना सौम्य शिक्षा. कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम चालू असताना पुरेशा भेटी न देणे, बॅरेजेसची कामे सुरू असताना गुणवत्तेच्या पुरेशा चाचण्या न घेणे, धरणांतून पाणीगळती यासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार.कोंढाणे (जि. रायगड) प्रकल्पाच्या अनियमिततेबाबत कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंत्यांची विभागीय चौकशी सुरू. चनेरा (रायगड), धामणी (कोल्हापूर), कुकडी (सीना बोगदा) व जिगाव प्रकल्प (बुलडाणा) या प्रकल्पांची दक्षता पथकामार्फत चौकशी करणार. महामंडळाबाहेरील महामंडळाचे पथक नेमणार. (विशेष प्रतिनिधी)