शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत इमारतीवर कारवाई

By admin | Updated: July 1, 2016 02:51 IST

सानपाडा सेक्टर ५ येथील तळमजला अधिक चार मजली अनधिकृत इमारतीवर सिडकोने गुरूवारी धडक कारवाई केली.

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ५ येथील तळमजला अधिक चार मजली अनधिकृत इमारतीवर सिडकोने गुरूवारी धडक कारवाई केली. या कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत सानपाड्यातील सेक्टर ५ मध्ये नरेश कृष्णा नाईक यांनी प्लॉट क्रमांक १५९ वर उभारलेल्या चार मजली इमारतीवर गुरूवारी बुलडोझर फिरविण्यात आला. या कारवाईच्या वेळी ग्रामस्थांनी रस्त्यावर आडवे होवून अतिक्रमण विभागाचा बुलडोझर अडविण्याचा प्रयत्न केला. यात महिलांची संख्या मोठी होती. यावेळी पोलिसांनी बळाचा केल्याने तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांना दूर केल्यानंतर दुपारी दीड वाजता इमारत पाडण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली. सायंकाळपर्यंत इमारतीचे तीन मजले जमीनदोस्त करण्यात आले. शुक्रवारी पुन्हा याच परिसरात अन्य बांधकामांवर कारवाई केली जाणार असल्याचे सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे नियंत्रक (उत्तर) पी.बी. राजपूत यांनी सांगितले.दरम्यान, प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी महिलांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोच्या या कारवाईच्या विरोधात येत्या काळात पुन्हा आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)