शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थान समित्यांवर दोन महिन्यांत कारवाई

By admin | Updated: March 8, 2017 01:24 IST

पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थान समित्यांच्या कारभारात अनियमितता आढळल्या पण त्या गंभीर नव्हत्या. आता सुरू असलेले लेखा परीक्षण आणि गंभीरता तपासणीचे काम येत्या दोन

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थान समित्यांच्या कारभारात अनियमितता आढळल्या पण त्या गंभीर नव्हत्या. आता सुरू असलेले लेखा परीक्षण आणि गंभीरता तपासणीचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिले. कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर, श्री जोतिबा देवस्थानासह ३ हजार ६७ मंदिरांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या देवस्थान समितीने केलेल्या गैरव्यवहारांबाबतचा प्रश्न शिवसेनेचे संजय रायमूलकर, भरतशेठ गोगावले आदी सदस्यांनी उपस्थित केला होता. राष्ट्रवादीचे जयंत पाटील,कोल्हापूर जिल्ह्यातील सदस्य हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर या प्रश्नावर आक्रमक झाले. या गैरव्यवहारांबाबत चौकशी व कारवाईचे आश्वासन वर्षभरापूर्वी सभागृहात देऊनही ठोस कारवाई झाली नाही.लेखा परीक्षणाचा अहवाल आला त्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार समोर आला आहे.महागड्या गाड्यांची खरेदी करण्यात आली, असेही त्यात म्हटले आहे याकडे मुश्रीफ यांनी लक्ष वेधले. या गैरव्यवहारांची चौकशी पूर्ण करून कारवाईचा कालबद्ध कार्यक्रम काय तो सांगा, असा आग्रह भरतशेठ गोगावले यांनी भरला. समितीकडील ८ हजार एकर जमीन ७०० कोटी रुपयांत विकण्यात आली, हा पैसा कुठे गेला. समितीच्या जमिनीवर खाणकामासाठी मिळालेल्या रॉयल्टीची कोट्यवधी रुपयांची रक्कम हडपण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. राज्यमंत्री केसरकर यांनी वारंवार सांगितले की १९६९ ते २००७ पर्यंतचे समितीचे लेखापरीक्षण करण्यात आले आहे. उर्वरित वर्षांचे लेखापरीक्षणाचे काम सुरु आहे. लेखा परीक्षण अहवालात गैरव्यवहार आढळला असेल तर त्याची गंभीरता तपासण्याची गरजच काय, सरकारने कारवाईबाबत घोषणा करावी, असा आग्रह जयंत पाटील यांनी धरला. सीआयडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करून कारवाई केली जाईल. एसआयटी वा अन्य यंत्रणांमार्फत चौकशीस त्यांनी नकार दिला.विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार या प्रश्नावर आणखी बोलू इच्छित होते मात्र, अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी पुढचा प्रश्न पुकारला. (विशेष प्रतिनिधी)