शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

डोनेशनसाठी विद्यार्थ्यांचा वापर केल्यास कारवाई

By admin | Updated: December 18, 2015 01:16 IST

बऱ्याच शाळा विद्यार्थ्यांवर विविध प्रकारच्या देणगी गोळा करण्याची जबाबदारी सोपवितात. त्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकतात. भीतिपोटी विद्यार्थी देणगी गोळा करण्यासाठी

नागपूर : बऱ्याच शाळा विद्यार्थ्यांवर विविध प्रकारच्या देणगी गोळा करण्याची जबाबदारी सोपवितात. त्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकतात. भीतिपोटी विद्यार्थी देणगी गोळा करण्यासाठी फिरतात. हा प्रकार थांबविण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार मंगलप्रसाद लोढा यांनी विधानसभेत केली. याची दखल घेत, डोनेशन गोळा करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. विधानसभेत लक्ष्यवेधी सूचनेवर बोलताना, आ. मंगल प्रभात लोढा म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून लहान वयांच्या विद्यार्थ्यांनादेखील स्कूल अ‍ॅक्टिविटीच्या नावाखाली डोनेशन गोळा करण्यास भाग पाडले जाते. ही एक सामान्य प्रक्रिया बनली आहे. अतिरिक्त रक्कम गोळा करण्यासाठी शाळांचा हा गोरखधंदा सुरू आहे. यावर अंकुश लावण्याची गरज आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन सपकाळ, हसन मुश्रिफ, संजय केळकर, राहुल कूल, अबू आझमी आदींनीही या विषयावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी लोढा यांनी कोचिंग क्लासेसवरदेखील बंदी घालण्याची मागणी केली. राज्यात कोचिंग क्लासच्या रूपात शिक्षण माफियाचे काम जोरात सुरू आहे. ट्युशन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये उकळले जात आहे. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)