शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात डायग्नोस्टिक सेंटरवर कारवाई

By admin | Updated: June 9, 2016 18:14 IST

पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत जिल्हयातील सिंदखेड राजा येथील डॉ. सदानंद बनसोड यांच्या साई डायग्नोस्टिक सेंटरवर 6 जून 2016 रोजी कारवाई करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. ९ -  पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत जिल्हयातील सिंदखेड राजा येथील  डॉ. सदानंद बनसोड यांच्या साई डायग्नोस्टिक सेंटरवर  6 जून 2016 रोजी कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान साई डायग्नोस्टीक सेंटर सील करण्यात आले आहे. सदर कारवाई जिल्हा शल्य चिकीत्सक बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली  ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक व सिंदखेड राजा तहसिलदार यांनी एकत्रितरित्या केली आहे.   
जिल्हा शल्य चिकीत्सक जालना यांनी दिलेल्या गोपनीय माहितीवरुन  6 जून 2016 रोजी बुलडाणा जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांचे उपस्थितीत तहसिलदार सिंदखेड राजा व वैद्यकीय अधिक्षक यांनी डॉ. सदानंद बनसोड यांचे साई डायग्नोस्टिक सेंटरवर पिसिपीएनडीटी कायदयांतर्गत लोकहितार्थ सिल करण्याची कार्यवाही केली.
कार्यवाही केल्यानंतर जिल्हा शल्य चिकीत्सक जालना यांनी तहसिलदार व वैद्यकीय अधिक्षक सिंदखेड राजा यांचे नावे दोन साक्षिदारांचे जाबाबासह पत्र दिले. साक्षिदारांचे जबाबात साई डायग्नोस्टिक सेंटर येथे साक्षिदारांची नातेवाईक असलेल्या गरोदर महिलेच्या पोटातील बाळाचे गर्भलिंग तपासणी करुन मुलगी असल्याचे डॉ.बनसोड यांनी सांगीतले होते. त्या जबाबाच्या अनुषंगाने डॉ. सदानंद बनसोड सिं.राजा यांचे सोनोग्राफी सेंटरवर पिसिपीएनडीटी कायदयांतर्गत सिल करण्याची कार्यवाही करण्यात आली, असे जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी सांगितले