शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘लोटा बहाद्दरां’वर होणार गुड मॉर्निंग पथकाची कारवाई

By admin | Updated: September 18, 2016 00:43 IST

नगर परिषदेने शनिवार (दि. १७)पासून ‘गुड मॉर्निंग’ पथकाद्वारे उघड्यावर शौचाला बसणाऱ्या ‘लोटा बहाद्दरां’वर कारवाई करण्यास सुरुवात केली

इंदापूर : नगर परिषदेने शनिवार (दि. १७)पासून ‘गुड मॉर्निंग’ पथकाद्वारे उघड्यावर शौचाला बसणाऱ्या ‘लोटा बहाद्दरां’वर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.अनेक महिन्यांपासून बंद असलेले गुड मॉर्निंग पथक परत कार्यरत झाल्याने उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना पुन्हा एकदा त्रेधातिरपटीला सामोरे जावे लागणार आहे. माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे यांनी शहर स्वच्छ व निर्मलग्राम होण्यासाठी पुढाकार घेतला होता. गुड मॉर्निंग पथकाबरोबर ते स्वत: तसेच मुख्याधिकारी नानासाहेब कामठे जातीने फिरत होते. त्यांच्या कामगिरीमुळे सव्वाशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच इंदापूर नगर परिषदेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. इजगुडे पदावरून पायउतार झाल्यानंतर ही मोहीम थंडावली होती. ती पुन्हा कार्यरत झाली आहे. या संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना नगराध्यक्षा उज्ज्वला राऊत म्हणाल्या, की शहर स्वच्छ व निर्मलग्राम होण्याच्या दृष्टीने गुड मॉर्निंग पथक पुन्हा कार्यरत करण्यात आले आहे. या पथकाद्वारे उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वारंवार ताकीद देऊनही सवय न बदलणाऱ्यांवर पोलीस कारवाई केली जाणार आहे. ती टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी वैयक्तिक शौचालयांचा वापर करावा. ज्यांच्याकडे ती नाहीत, त्यांनी सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. >या मोहिमेसाठी नागरिकांचे सहकार्य मिळणे महत्त्वाचे आहे. वारंवार आवाहन करूनदेखील प्रतिसाद मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. ज्या नागरिकांनी शौचालय बांधण्यासाठी अनुदानाचा पहिला हप्ता घेतला; मात्र बांधकामाला सुरुवात केली नाही अशा नागरिकांनी अनुदानाची रक्कम परत नगर परिषदेकडे जमा करावी. - नानासाहेब कामठे, मुख्याधिकारी