शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या परीक्षेच्या कॉपीप्रकरणी पाच जणांवर कारवाई

By admin | Updated: March 7, 2017 21:32 IST

दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीचा हैदोस संदर्भातील व्हीडीओ व्हायरल होताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलवून संबंधित पाच जणांवर तातडीने कारवाईचे आदेश

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 7 : दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विसरवाडी, ता.नवापूर येथील केंद्रावरील कॉपीचा हैदोस संदर्भातील व्हीडीओ व्हायरल होताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलवून संबंधित पाच जणांवर तातडीने कारवाईचे आदेश काढले आहेत.दहावीच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली. मराठीच्या पहिल्या पेपरला काही केंद्रांवर कॉपी सुरू असल्याची चर्चा होती. विसरवाडी, ता.नवापूर येथील केंद्रावरील व्हीडीओ व्हायरल झाला. या केंद्रावर राजरोसपणे कॉपी पुरविणाऱ्यांचे चित्र समोर येताच जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता समितीची बैठक बोलवली़ प्रकरणाची गंभीर दखल घेत, त्या भागाचे विस्तार अधिकारी शामराव देवरे तसेच केंद्रप्रमुख मनोज साळवे यांना तातडीने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला़ तसेच केंद्रसंचालक एऩआऱ दशपुत्रे यांच्यासह दोन पर्यवेक्षकांना तातडीने निलंबित करावे, असे आदेश संबधित संस्थेला देण्यात आले़ दरम्यान, या केंद्रावर नवीन केंद्रप्रमुख म्हणून मधुकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ बैठकीला जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांच्यासह जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे तसेच प्राथमिक व माध्यामिक जिल्हा शिक्षणाधिकारी उपस्थित होते़निलंबनाच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून जिल्हाधिकारी यांनी येत्या दिवसात होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी कठोर पावले उचलणार असल्याचे ‘लोकमत’सोबत बोलताना सांगितले़