शहरं
Join us  
Trending Stories
1
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
2
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
3
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
4
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
5
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
6
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
7
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
8
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
9
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
10
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
11
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
12
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
13
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
14
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
15
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
16
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
17
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
18
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
19
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
20
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र

महापारेषणच्या ६३ अभियंत्यांवर कारवाई

By admin | Updated: May 24, 2016 04:37 IST

महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीत सरळसेवा भरतीत झालेला गैरप्रकार चव्हाट्यावर आला असून तब्बल ६३ अभियंत्यांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली आहे. १२ जणांना

- राजेश निस्ताने,  यवतमाळ

महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीत सरळसेवा भरतीत झालेला गैरप्रकार चव्हाट्यावर आला असून तब्बल ६३ अभियंत्यांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली आहे. १२ जणांना बडतर्फ करण्यात आले असून ५१ अभियंत्यांची पदावनती (डिमोशन) केले गेले आहे. या अभियंत्यांवर अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका ‘व्हिजीलन्स’ने ठेवला आहे. वीज पारेषण कंपनीमध्ये ८ जानेवारी २०१४ ला तांत्रिक संवर्गातील कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर जागांकरिता सरळसेवा भरती घेण्यात आली. कार्यकारी अभियंता पदाकरिता शैक्षणिक पात्रतेसोबतच नऊ वर्षांचा अनुभव तर अतिरिक्त कार्यकारी अभियंता (उपकार्यकारी) पदाकरिता सात वर्षांचा अनुभव आवश्यक होता. अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदाच्या सर्वाधिक ५८ जागा होत्या. २६ फेब्रुवारी २०१४ ला या पदांची आॅनलाइन परीक्षा तर नोव्हेंबर २०१४ ला मुलाखती पार पडल्या आणि फेब्रुवारी २०१५ मध्ये या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. सुमारे वर्षभर त्यांनी सेवा दिली. यात काही उमेदवार बाहेरून थेट भरतीद्वारे निवडले गेले तर काही वीज कंपन्यांमध्ये आधीच सेवेत असलेले अभियंते वरिष्ठ पदावर पात्र ठरले.यातील बहुतांश उमेदवारांनी सादर केलेले अनुभव प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार महापारेषणला प्राप्त झाली. त्यानंतर दक्षता (व्हिजीलन्स) विभागामार्फत केलेल्या चौकशीत तथ्य आढळून आले. अनेक उमेदवारांनी बड्या इलेक्ट्रीकल कंत्राटदारांकडील कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र जोडले होते. मात्र व्हिजीलन्सच्या चौकशीत सदर कंत्राटदाराने या उमेदवाराला किती वेतन दिले, पीएफ कापला का, प्राप्तिकर भरला का याची उत्तरे मिळू शकली नाहीत. अखेर ६३ अभियंत्यांनी बोगस अनुभव प्रमाणपत्रे सादर केल्याचा ठपका व्हिजीलन्सने ठेवला. व्यवस्थापकीय संचालक कार्यालयाने या ६३ अभियंत्यांवर २० मे रोजी कारवाई केली. त्यात १२ अभियंत्यांना बडतर्फ, एक कार्यकारी व ५० अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याचे डिमोशन करण्यात आले. वर्षभर आर्थिक लाभ घेणाऱ्या या अभियंत्यांवर शिक्षा म्हणून आणखी काय कारवाई करता येईल, याची चाचपणी केली जात आहे. उमेदवारांमध्ये अन्यायाची भावना महापारेषणने बडतर्फ व डिमोशनची कारवाई केलेल्या अभियंत्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हटले आहे. जाहिरातीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनुभव प्रमाणपत्र अर्जासोबत मागितले नव्हते. आॅनलाइन परीक्षेच्या वेळी त्याची मागणी झाली नाही, अचानक २९ मे २०१४ ला अधिसूचना काढून प्रमाणपत्र मागण्यात आले. दक्षता विभागाने उमेदवारांना विश्वासात न घेता थेट अनुभव घेतलेल्या कंत्राटदार-कंपन्यांकडे पत्रव्यवहार केले. आम्ही सादर केलेल्या उत्तरांचा विचार झाला नाही. नेमक्या कोणत्या कारणावरून आमची प्रमाणपत्रे बोगस वाटली हे दक्षता विभागाने स्पष्ट केले नाही, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. महापारेषणच्या भरती प्रक्रियेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दक्षता पथकामार्फत उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. त्याबाबतचा अहवाल व्यवस्थापनाला प्राप्त झाला आहे. खोटी व बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या उमेदवारांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री