शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

आचार्य प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांचे निधन

By admin | Updated: September 27, 2016 01:25 IST

आचार्य श्री प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी जैन समाजातील पाच सदस्यांनी मिळून ११.११ कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची बोली लावली होती.

मुंबई : आचार्य श्री प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी जैन समाजातील पाच सदस्यांनी मिळून ११.११ कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची बोली लावली होती. त्यांचे शनिवार-रविवारच्या मध्यरात्री निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. ते जैन धर्माच्या तपगच्छ शाखेचे प्रमुख होते. त्यांनी हजारो लोकांना दीक्षा दिली आहे. जैन धर्मात महान संताच्या अंत्यविधीत सहभागी होणे हे सदस्यांसाठी सन्मानाचे समजले जाते. अंतिम संस्कारासाठी लावण्यात आलेल्या बोलीच्या रकमेतून प्राप्त झालेल्या निधीचा उपयोग धार्मिक आणि प्राणिमात्रांच्या हितासाठी करण्यात येतो. आचार्य प्रेमसूरीश्वरजी यांच्या अंत्यविधीसाठीची बोली वाळकेश्वरच्या बाबू पन्नालाल जैन मंदिरात झाली. ही प्रक्रिया तीन तास चालली. एक प्रसिद्ध डॉक्टर, एक बिल्डर आणि तीन प्रसिद्ध व्यावसायिकांनी जैनाचार्य यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी ११ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांची बोली लावली. खांदा देण्यासाठी प्रत्येकी २१ लाख रुपयांची बोली चार सदस्यांनी लावली. पालखीच्या चारही बाजूंना पाण्याने भरलेले पात्र ठेवण्यासाठी २१ लाखांची बोली लावण्यात आली होती. ११.११ कोटी रुपयांची बोली लावणाऱ्या जैन समाजातील पाचही सदस्यांनी मिळून काल दुपारी ४.३० वाजता जैन मुनींच्या पार्थिवाला अग्नी दिला. जैन समाजाचे एक सदस्य गिरीश जैन यांच्यामते ज्या स्थळावर जैनाचार्यचे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथे बोलीतून मिळालेल्या रकमेतून भव्य मंदिर बनविण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार ह्युजेस रोडवरील पंचशिल प्लाझा बिल्डिंगच्या मागील मैदानावर करण्यात आले. त्यांना पूर्वी ब्रीच कॅन्डी रुग्णालय आणि शनिवारी रात्री सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवसेना तसेच भाजपाच्या नेत्यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तपगच्छाधिपती प्रेमसूरीश्वरजी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जगभरात १० लाख संदेश पाठविण्यात आले. (प्रतिनिधी) रवींद्रसूरीजी म.सा. यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी ७ कोटींची बोली जुलै महिन्यात जैनाचार्य श्रीमद्विजय रवींद्रसूरीजी महाराज यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी ७ कोटी रुपयांची सामुहिक बोली लावली होती. रवींद्रसूरीजी महाराज यांचे मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील राजगड येथे निधन झाले होते. अंत्यसंस्काराच्या २५ विधीसाठी वेगवेगळी बोली लावण्यात आली होती. खांदा देण्यासाठी ४ सदस्यांनी १.५७ कोटी रुपयांची बोली लावली होती. महाराजांचे पार्थिव चितेवर ठेवण्यासाठी ४१.४१ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती.