शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी बॉम्बस्फोटांतील आरोपी राज्य एटीएसकडे

By admin | Updated: August 2, 2016 05:50 IST

तिहेरी बॉम्बस्फोटांसाठी दुबईतून पैसे पुरविणाऱ्या हवाला आॅपरेटरचा ताबा दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घेतला आहे.

मुंबई : शहरात १३ जुलै २०११ रोजी झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांसाठी दुबईतून पैसे पुरविणाऱ्या हवाला आॅपरेटरचा ताबा दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घेतला आहे. राष्ट्रीय तपासी यंत्रणेने (एनआयए) त्याला अटक केली होती. त्याला ५ आॅगस्टपर्यंतची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.अब्दुल वाहिद उर्फ अब्दुल उर्फ सिद्दिबाप्पा (३५) असे या हवाला आॅपरेटरचे नाव असून, तो मूळचा कर्नाटकातील भटकळ गावचा रहिवासी आहे. यासीन भटकळच्या संपर्कात आल्यानंतर त्याने दुबईला बस्तान बसवले होते. तो दुबईत राहून इंडियन मुजाहिद्दिनसाठी फंड गोळा करीत असे, अशी माहिती समोर आली होती. मुंबईत १३ जुलै २०११ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांसाठीदेखील त्यानेच पैसा उभा केला होता. त्याने हा पैसा हवालामार्फत दिल्लीत कुंवर पथरिजा याच्याकडे पाठविला होता. त्यानंतर तो यासीन भटकळला मिळाला होता. यासीनने या पैशांचा वापर स्फोटके खरेदी करण्यासाठी तसेच इतर खर्चासाठी केला होता, असे त्याच्या चौकशीत उघड झाले.दादर येथील कबुतरखाना, झवेरी बाजार आणि आॅपेरा हाउस येथे एकाच वेळी झालेल्या स्फोटांत तब्बल २६ जणांचा मृत्यू तर १३० जण जखमी झाले होते. या प्रकरणी तब्बल १२ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत अब्दुल वाहिदचे नाव उघड झाले होते. तो दुबईत असल्याची माहिती मिळाल्यावर एनआयएनने इंटरपोलच्या मदतीने त्याला अटक केली. या वेळी एनआयएने त्याची चौकशी केल्यानंतर त्याचा ताबा राज्य एटीएसकडे देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)