शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचारातील आरोपी महिन्याने जेरबंद

By admin | Updated: September 22, 2016 03:32 IST

दूरध्वनीच्या आधारे लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील फरारी आरोपी इम्रान चौधरी (२३) याला पकडण्यात कळवा पोलिसांना यश आले आहे.

ठाणे : ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या एका निनावी गोपनीय दूरध्वनीच्या आधारे लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील फरारी आरोपी इम्रान चौधरी (२३) याला पकडण्यात कळवा पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या एका चुकीमुळे तो पसार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. ठाणे न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या आरोपीची माहिती नियंत्रण कक्षाच्या एक शून्य शून्य या क्रमांकावर पोलीस हवालदार सुनीता शिंदे यांना २१ सप्टेंबर २०१६ रोजी मध्यरात्री १२.३० वा.च्या सुमारास एका दक्ष नागरिकाने दिली. कळवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद असलेला आरोपी भास्करनगर भागात वास्तव्यास असल्याचा पत्ताही या व्यक्तीने दिला. शिंदे यांनी या दूरध्वनीची गांभीर्याने दखल घेऊन कळवा पोलिसांना त्याबाबतची तत्काळ माहिती दिली. तिच्या आधारे कळवा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तत्काळ भास्करनगर येथे जाऊन इम्रानला अटकही केली. आलेल्या कॉल्सची गांभीर्याने दखल घेऊन एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या रात्रपाळी ड्युटीवरील हवालदार शिंदे यांच्यासह नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी आणि कळवा पोलिसांचे मुख्यालय पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)>काय घडला प्रकार...भास्करनगर भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीला त्याने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. मुलीला त्याने फूस लावल्याचे समजल्यानंतर मुलीच्या पालकांनी तिला उत्तर प्रदेशातील बलिया गावी नातेवाइकांकडे पाठवले होते. इम्रानने तिला तिथूनही पळवून आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच नालासोपाऱ्यातील एका घरातही त्याने तिला कोंडून ठेवले होते.या घरातून तिने कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर, २७ आॅगस्ट २०१६ रोजी याप्रकरणी तिने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.