शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर अपघात

By admin | Updated: November 23, 2015 02:01 IST

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर जीप व टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार तर अन्य ८ जण जखमी झाले.

नाशिक : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर जीप व टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार तर अन्य ८ जण जखमी झाले. मृत ठाणे जिल्ह्यातील असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. वावी-पांगरी गावांदरम्यान शिंदे वस्तीजवळ शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. कोशिंबी ता. भिवंडी (जि.ठाणे) येथील १७-१८ जण देवदर्शनासाठी पिकअप जीप घेऊन शिर्डीच्या दिशेने निघाले होते. सिन्नरच्या पुढे गेल्यावर समोरुन येणाऱ्या डाक पार्सलच्या टेम्पोसमवेत या जीपची टक्कर झाली. त्यानंतर जीप उजव्या बाजूला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खोल गटारात उलटली. रात्रीच्या अंधारात जखमी महिला व लहान मुले यांचे रडणे व किंकाळ्यांमुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. यावेळी अन्य वाहनचालकांनी घटनेची माहिती वावी पोलिसांना दिली. पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णवाहिका व खासगी वाहनांनी जखमींना सिन्नरच्या खासगी रुग्णालयात नेले.या अपघातात ज्ञानेश्वर नामदेव ठाकरे (३०), नेहा ज्ञानेश्वर ठाकरे (२७) दोघेही रा. कोशिंबी ता. भिवंडी या दाम्पत्यासह योगिता संतोष चौधरी (२५) रा. आडगाव, ता. शहापूर हे तिघेजण ठार झाले. तर अनिल बबन पालवी, अंजना अनिल पालवी, राम गणपत सपाट, ज्ञानेश्वर कान्हु शिंदे, उमेश परशुराम ठाकरे, गणेश विष्णू चौधरी, अजय राम सपाट हे जखमी झाले. अन्य एक गंभीर जखमी असून त्यास नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)