शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

अपघात विमा दावे घोटाळ्याची चौकशी

By admin | Updated: September 5, 2016 04:02 IST

अपघात विमा दावे घोटाळ््यांची न्यायालयीन चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलला सादर करण्यात आला आहे.

राजेश निस्ताने,

यवतमाळ- अपघात विमा दावे घोटाळ््यांची न्यायालयीन चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलला सादर करण्यात आला आहे. ‘लोकमत’मधून या घोटाळ्यांची वृत्तमालिका चालविण्यात आली होती. अपघात विमा कंपन्यांची कशी कोट्यवधी रुपयांनी फसवणूक होत आहे, याचे या वृत्तमालिकेतून पुरावेही दिले होते. बार कौन्सिल आॅफ इंडियाने या वृत्तमालिकेची दखल घेऊन अपघात विमा दावे घोटाळ्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलला दिले होते. त्यानुसार निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्या खरे यांना चौकशीसाठी नियुक्त करण्यात आले.गेले तीन महिने यवतमाळमध्ये ही चौकशी चालली. या चौकशीचा अहवाल महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलकडे नुकताच सादर करण्यात आला आहे. बार कौन्सिलच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा अहवाल जसाचा तसा बार कौन्सिल आॅफ इंडियाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.>मिळाले भक्कम पुरावे ?निवृत्त न्यायाधीशांनी केलेल्या चौकशीत नेमके काय निष्पन्न झाले आणि अहवालात काय नमूद आहे, हे स्पष्ट नसले तरी अपघात विमा दाव्यातील गैरप्रकारांचा एकूणच गोंधळ पुढे आल्याचे व त्याचे भक्कम पुरावेही मिळाल्याचे बोलले जाते. या गैरप्रकारांमध्ये पोलीस, डॉक्टर, वकील, विमा सर्वेअर, विमा अधिकारी असे सर्वच घटक कमी-अधिक प्रमाणात सहभागी असल्याची गंभीर बाब चौकशीदरम्यान पुढे आल्याची चर्चा आहे. >लाभ मिळविण्यासाठी गैरप्रकारअपघात विम्याचा लाभ मिळविण्यासाठी पोलिसांच्या साक्षीने राज्यात बहुतांश ठिकाणी गैरप्रकार सुरू आहेत. अज्ञात वाहन असताना सोईचे वाहन घटनास्थळावर दाखविणे, पैसे देऊन चालक उभा करणे, त्याआधारे विमा कंपन्यांकडे नुकसानभरपाईचे सुमारे एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे दाखल करणे, या कंपन्यांच्या सर्वेअर, संबंधित अधिकाऱ्यांना मॅनेज करणे आदी प्रकार सर्रास सुरू आहे. यात ‘टक्केवारी’नुसार काही वकिलांचाही सहभाग दिसून आल्याने बार कौन्सिल आॅफ इंडियाने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली.आणखी तीन जिल्ह्यांत चौकशीअपघात विमा दाव्यातील यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आलेला घोटाळा पाहून परभणी, हिंगोली, वाशिम या लगतच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा न्यायाधीशांमार्फत तेथील प्रकरणांची चौकशी केली जात असल्याची माहिती विधि सूत्रांनी दिली.