शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

डिंभे-आहुपे रस्त्यावर अपघात, ४८ प्रवासी जखमी

By admin | Updated: July 13, 2016 14:58 IST

मंचर-आहुपे व आसाणे- कुर्ला नेहरूनगर या दोन एसटी बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत ४८ प्रवासी जखमी झाले.

ऑनलाइन लोकमतघोडेगाव, दि. 13 - मंचर-आहुपे व आसाणे- कुर्ला नेहरूनगर या दोन एसटी बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत ४८ प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी आंबेगाव तालुक्यात डिंभे आहुपे रस्त्यावर फुलवडे गावच्या हद्दीत झाला. जखमींवर घोडेगाव ग्रामीण रुग्णालय व डिंभे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत. अडिवरे गावचा बाजार असल्याने बहुतेक लोक आहुपे एसटीने (एमएच-२०/डी-७७१४) बाजारासाठी निघाले होते. तर आसाणे गाडीत (एमएच- १४/बीटी-१५२८) महाविद्यालयीन विद्यार्थी जास्त होते. फुलवडे गावच्या पुढे असलेले अवघड वळण घेवून आहुपे गाडी पुढे गेली असता समोरून आलेल्या आसाणे बसला धडक बसली. तसेच बीएसएनएलची केबल टाकण्यासाठी रस्ता बाजूने खोदल्याने अतिशय खराब व छोटा झाला आहे. त्यामुळे हा अपघात घडला. यात दोन्ही बसमधील प्रवाशांच्या तोंडाला जबर मार लागला. अनेकांचे दात पडले, तर काहींच्या जबडयाला जबर मार लागला. ४८ पैकी चार प्रवाशांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. सर्व जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले. एसटी महामंडळानेही जखमींना एक हजार रूपये रोख स्वरूपाची मदत केली.अनर्थ टळलाअपघात घडला त्या ठिकाणी खालच्या बाजुला डिंभे धरणाचा जलसाठा आहे. या दोन्ही बस चालकांनी प्रसंगसावधान ठेवून गाडया जाग्यावर ठेवल्या. चुकून यातील एखादी गाडी खालच्या बाजुला गेली असती तर बस सकट सगळे प्रवाशाी पाण्यात गेले असते.