शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडाहून आलेले ३०० कोटी स्वीकारले, दिग्विजय सिंग यांचा केजरीवालांवर आरोप

By admin | Updated: August 27, 2016 19:36 IST

आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी कॅनडाहून ३०० कोटी रुपयांची देणगी स्वीकारली असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी केला आहे

- ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 27 - आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी कॅनडाहून  ३०० कोटी रुपयांची देणगी स्वीकारली असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी केला आहे. हे पैसे त्यांनी रोख स्वरूपात स्वीकारल्याचे म्हटले आहे. 
प्रशासनात पारदर्शता आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाच्या गोष्टी करणारे अरविंद केजरीवाल यांनी स्वत: अपारदर्शी कारभार ठेवला आहे. पक्षासाठी कॅनडाहून आलेली ३०० कोटी रुपयांची देणगी केजरीवाल यांनी रोखड स्वरूपात स्वीकारली आहे. पक्षाचे खाते नाही आणि खजिनदार नाही या सबबीवर त्यांनी हा निधी कॅश स्वरूपात घेतला असल्याचे दिग्वीजय यांनी पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 
केजरीवाल यांचा स्वच्छ प्रशासनाचा दावा ही केवळ भूलथाप असून दिल्लीत या सरकारने स्वैर कारभार चालविला आहे. संसदीय सचिवांच्या नियुक्तीच्या बाबतीतही पारदर्शकता राखलेली नाही. कायदेशीर प्रक्रियाही पार पाडली गेली नाही असे त्यांनी सांगितले.  गोव्यात आम आदमी पार्टीने बँक खाते खोलले आहे का याची लोकांनी खात्री करून घ्यावी असा टोलाही त्यांनी हाणला.
 
‘मोदी, वाजपेयीही पाकिस्तानमध्ये गेले होते’
पाकिस्तानात जाणे म्हणजे नरकात जाणे असे जे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना आताच का वाटते असा प्रश्न दिग्विजय सिंग यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीही पाकिस्तानमध्ये गेले होते. त्यावेळी पर्रीकर का बोलले नाहीत. वाजपेयी यांनी लाहोर ते भारत बस सुरू केली होती तेव्हा का बोलले नाहीत असा प्रश्नही त्यांनी केला.